मुंबई : उन्हाळ्यात घाम येण्याचा त्रास अधिक असतो. घामामुळे शरीराला दुर्गंधी येण्याचा त्रासही अधिक असतो. अशावेळेस नकळत तुम्ही चारचौघांमध्ये खजिल होता. घामाचा दुर्गंध टाळण्यासाठी तुम्ही बॉडी स्प्रेकही निवड करणार असाल तर थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. केवळ सुवास आणि ब्रॅन्ड पाहून डिओ निवडू नका तर या गोष्टींचंही भान अवश्य ठेवा. 


डिओ विकत घेताना कोणती काळजी घ्याल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्कोहल फ्री डिओ -  


तुम्ही नियमित डिओचा वापर करणार असाल तर तो अल्होहल फ्री असणं आवश्यक आहे. नियमित अल्होहल फ्री डिओ वापरला तर त्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन किंवा अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो. 'या' घरगुती उपायांंनी कमी करा अंडरआर्म्सचा काळसरपणा


त्वचेनुसार निवडा डिओ - 


तुमची त्वचा अतिशय संवेदनशील असेल तर इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काळजी घ्या. ज्या डिओमध्ये अ‍ॅल्युमिनियम कोलोहायड्रेट असेल त्यामध्ये कुलिंग इफेक्ट असतो. यामुळे तुम्हांला स्किन अ‍ॅलर्जीचा धोका टाळता येतो. 


खूप घाम येत असल्यास - 


काही लोकांना खूप येण्याचा त्रास असतो. त्यामुळे अल्पावधीतच डिओचा प्रभाव कमी होतो. अशा लोकांनी डिओ स्प्रे ऐवजी रोल ऑन्स वापरणं अधिक फायदेशीर आहे. याचा परिणाम अधिक काळ राहतो. 


अंडरआर्म्स शेव्ह  करण्याची सवय 


ज्यांना अंडरआर्म्स शेव्ह करण्याची सतत गरज पडते त्यांनी डिओ स्प्रेचा वापर करणं त्वचेला नुकसानकारक ठरू शकते. स्टिक असणारे डिओ वापरणं अधिक फायदेशीर आहे. 


उग्र वासाचे डिओ टाळा 


डिओचा वास जितका उग्र तितका त्यामध्ये आर्टिफिशियल केमिकल्सचा वापर अधिक असल्याचं स्पष्ट होते. त्यामुळे मंद सुवासाचे डिओ निवडा. यामुळे त्वचेच्या अ‍ॅलर्जीचा धोका कमी असतो.