मुंबई : तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का...जर तुम्ही या समस्येने त्रस्त आहात तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. बद्धकोष्ठतेवर आयुर्वेदीक उपचार देखील प्रभावी ठरतात. आयुर्वेदात नमूद केल्याप्रमाणे, नारळाचं तेल हे बद्धकोष्ठतेसाठी एक चांगला आणि नैसर्गिक उपाय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बद्धकोष्ठतेच्या त्रासाने ग्रस्त असणाऱ्या रूग्णाने जर योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात वापरल्यास ते प्रभावीपणे कार्य करतं. नारळाचं तेल लिपिडने समृद्ध असते, जे आरोग्यास सुधारण्यास मदत करते.


आयुर्वेदाचे डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, नारळाच्या तेलात मध्यम प्रमाणात फॅटी एसिड असतं. जे तुमच्या कोलन आणि पाचन तंत्राशी संबंधित असलेल्या पेशींना उत्तेजित करतात. यामुळे या पेशींची उर्जा आणि चयापचय क्षमता वाढवतात. त्याचप्रमाणे हे आपलं पचनतंत्रही सुधारू शकतं.


डॉ. अबरार मुलतानी म्हणतात, की नारळाचं तेलामुळे शरीराच्या गतीसाठी फायदेशीर ठरतं आणि बद्धकोष्ठतेला प्रतिबंधित करतं. नारळ तेलामुळे चयापचय क्रियेला उत्तम बनवतं. यामुळे शरीरातून नको असलेले घटक निघून जातात आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित होते.


नारळाचं तेल हे ताज्या नारळाच्या दूधापासून काढलं जातं. ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेची तक्रार असते त्यांनी दररोज एक किंवा दोन चमचे नारळाचे तेलाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.


नारळ तेलाचे सेवन करण्याचे दोन मार्ग आहेत. दररोज सकाळी एक चमचा नारळ तेलाचं सेवन करू शकता तसंच सकाळच्या कॉफीमध्ये किंवा ज्यूसमध्ये तेलाचा वापर करू शकता. नारळ तेलाचं सेवन करणं सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम नाहीत. दरम्यान इतर आजार असलेल्या किंवा गर्भवती महिलांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.