मुंबई : पावसाळ्यात पोटा संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नेमके कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत हा मोठा प्रश्न सर्वांसमोर असतो. खरंतर पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच तुम्ही तुमचा आहार थोडा बदलला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालेभाज्या खाऊ नका
पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळा. कारण पावसाच्या पाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. आणि भाज्यांमध्ये किडे येण्याची शक्यताही वाढते. अशी भाजी खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकतात. 


मसालेदार अन्न खाऊ नका
पावसाळ्यात मसालेदार पदार्थ खाऊ नयेत कारण जास्त तळलेले, खारट खाल्ल्याने तुमचे पचन बिघडू शकते आणि तुम्हाला गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.


'या' गोष्टीचे सेवन करा 
पावसाळ्यात आंबा, पपई, सफरचंद, डाळिंब, नाशपाती, बेरी, पेरू इत्यादी हंगामी फळे खावीत. याने तुमची पचनशक्तीही चांगली राहील आणि तुमचे आरोग्यही चांगले होईल.


हर्बल चहा प्यावा
पावसाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हर्बल चहा अधिकाधिक प्यावा. उदाहरणार्थ, लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी आणि जिंजर टी प्या. यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होईल.