N95, कापडी की सर्जिकल कोणतं मास्क कोरोनापासून चांगला बचाव करतं?
कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे.
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. अशात N95 मास्क, कापडी मास्क तसंच सर्जिकल मास्क यांचा वापर केला जातो. यामध्ये अनेकवेळा कोणतं मास्क चांगलं हा प्रश्न कित्येकांसमोर येतो. मात्र आता याचं उत्तर कदाचित मिळालं आहे. नुकतंच झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्जिकल मास्क चांगलं असल्याचं समोर आलं आहे.
बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हा अभ्यास करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हा अभ्यास गोल्ड स्टॅंडर्टचा असून क्लिनिकल ट्रायलप्रमाणे करण्यात आला. याचा अर्थ हा अभ्यास करताना यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. येल विद्यापीठाचे जेसन अबालक यांनी हा अभ्यास केलाय. हा अभ्यास अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टमध्येही प्रकाशित झाला आहे.
ब्राउन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मेगन रेनी म्हणाल्या की, हा अभ्यास सांगतो की, कापडी मास्कपेक्षा सर्जिकल मास्क कसा चांगला आहे हे दर्शवतो. ते तुम्हाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवतात. तसंच, तुम्हाला श्वास घेण्यास आणि ते वापरण्यास कोणतीही अडचण येत नाही. गेल्या दीड वर्षांपासून शास्त्रज्ञ सांगत आहेत की मास्क कोरोनापासून संरक्षण करतं. पण किती आणि कसं? सांगणे कठीण होत होते. कारण मास्क घालूनही लोकांना कोरोनाची लागण होत होती.
मेगन म्हणाल्या की, ज्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारचं मास्क लावून कोरोनापासून किती संरक्षण मिळतं याचा अभ्यास केला होता, त्यांच्या अभ्यासावरील इतर अनेक कारणांमुळे त्यांचे परिणाम योग्य मिळत नव्हते. मास्कच्या अभ्यासाबाबत ठोस परिणाम सापडत नव्हते. म्हणून अमेरिकन शास्त्रज्ञांनी बांग्लादेशातील 600 गावांचा अभ्यास केला. या गावांतील 3.42 लाख लोकांची मास्क घालण्यासाठी आणि त्याचे परिणाम तपासण्यात आले.
शास्त्रज्ञांनी लोकांच्या दोन गटांमध्ये कोरोनाची लक्षणं तपासण्यास सुरुवात केली. यात एका गटातील लोकांना मास्क दिला तर दुसऱ्या गटाला नाही. चाचणी सुरू झाल्यानंतर 10 ते 12 आठवड्यांच्या दरम्यान गटातील लक्षण असलेल्या लोकांकडून रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. त्याच्या शरीरात कोरोना अँटीबॉडीजची चाचणी घेण्यात आली. ज्या गटाने मास्कचा योग्य वापर केला, फक्त 13.3 टक्के लोकांना संसर्ग झाला. तर, ज्यांना मास्क दिले गेले नाहीत त्यांच्यामध्ये 42.3 टक्के लोक कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले.
शास्त्रज्ञांनी 11 हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले. ज्यांना सर्जिकल मास्क देण्यात आले, तसेच त्यांना सतत परिधान करण्याची प्रेरणा देण्यात आली, त्या गटातील लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग इतर गटापेक्षा 9.3 टक्के कमी होता. शास्त्रज्ञांनी सांगण्यानुसार, अभ्यासात असं आढळून आलंय की, मास्क घालण्याच्या आवश्यकतेमुळे, लोकांना सतत प्रेरित करण्यासाठी मोठी मोहीम राबवून अधिकाधिक लोक कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यास सक्षम होतील. आम्ही लोकांना सर्जिकल मास्क दिले होते. त्याचे परिणाम फायदेशीर ठरले आहेत.
सर्जिकल मास्क किंवा कापड मास्क देण्यात आलेल्या गावकऱ्यांना इतर गटाच्या तुलनेत लक्षणात्मक संसर्गात 11.2 टक्के घट दिसून आली. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे अधिक सामान्य होतं. मास्क लावून कोरोनाला प्रतिबंध करणं शक्य असल्याचं अभ्यासाने सूचित केले आहे. लोक सर्जिकल मास्क किंवा कपडे किंवा दोन्ही एकत्र लावतात, त्यांना कोरोनापासून वाचवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.