मुंबई : कोरोनातून बरं झालेल्या रूग्णांना इतर समस्या समोर येत असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी म्यूकरमायकोसिस, टीबी तसंच लिव्हरच्या समस्या रूग्णांमध्ये दिसून येत असल्याचा दावा करण्यात आलाय. तर आता कोरोनामुक्त रूग्णांमध्ये अजून एक समस्या दिसून येत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये लोकांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये केसगळतीची समस्या दिसून येत आहे. काही लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतेय. 


दिल्लीमध्ये अशी प्रकरणं पहायला मिळाली आहेत. एका खाजगी रूग्णालयाच्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांमध्ये अशा रूग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे ज्यांचे केस गळत आहेत. कोरोनापासून बरे झाल्यानंतर 30 दिवसांनंतर, केस गळण्याची समस्या लोकांमध्ये दिसून आली. परंतु काही प्रकरणांमध्ये कोविड पॉझिटीव्ह असताना देखील या समस्ये झुंजत असल्याचं दिसून आलंय. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, कोविड दरम्यान बदललेला आहार, ताप, जास्त ताण आणि शरीरातील हार्मोनल बदल हे केस गळण्याचे कारण बनतात.


कोरोनामुळे, लोकांचा आहार खूप बदलतो, त्यांचं वजनात देखील फरक पडतो. शरीरातील व्हिटॅमिन डी आणि बी 12चं प्रमाण देखील कमी होतं. अशा परिस्थितीत कोविडमधून बरं झाल्यानंतर लोकांचे केस गळणं सुरू होतं. डॉक्टरांच्या मानण्यानुसार, केसगळतीमागे आहारातील बदल हे एक मोठं कारण असू शकतं.


तज्ज्ञ म्हणतात, या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी आहारात सुधार करावा लागेल. कोरोनामधून बरं झाल्यानंतरही, प्रत्येकाने संतुलित आहार घ्यावा जेणएकरून जीवनसत्त्वं आणि लोहाचं प्रमाण पुरेसे आहे. दुसरीकडे, जर योग्य आहार घेतल्यानंतर 5 ते 6 आठवड्यांनंतरही तुमची स्थिती सुधारली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.