कोरोनाच्या लढाईत गेमचेंजर ठरणार `ही` खास लस
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत ही लस महामारीविरुद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते.
मुंबई : भारत बायोटेकची नेझल वॅक्सिन कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते. या लसीला बूस्टर डोस म्हणून तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. संजय राय म्हणाले की, जर ही लस क्लिनिकल चाचण्यांमध्ये म्यूकोसल इम्युनिटी देते, तर ते एक मोठे यश असेल. अशा स्थितीत ही लस महामारीविरुद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते.
33 वॅक्सिनपैकी एकंही प्रभावी नाही
डॉ. संजय राय ANIशी बोलताना म्हणाले, जर ही लस म्यूकोसल इम्युनिटी प्रदान करत असेल तर मानवजातीसाठी एक मोठी गोष्ट ठरू शकते. जगभरात 33 लसी आहेत, परंतु संसर्ग रोखण्यासाठी एकही प्रभावी नाही. आम्हाला आशा आहे की, ही लस म्यूकोसल इम्युनिटी शक्ती प्रदान करेल, ज्यामुळे महामारीला पुढे प्रसरण्यासाठी रोखता येईल.
AIIMS च्या वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सरकार सादर करणार्या अर्थसंकल्पात प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासंबंधी घोषणा असायला हव्यात. ही गोष्ट फार महत्वाची आहे.
ती म्हणाली की, "कोरोना ही काही शेवटची महामारी नाही. भविष्यातील महामारीसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. एवढेच नाही तर येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज आहे."
भारताच्या औषध नियंत्रक जनरलने हैदराबादमध्ये बूस्टर डोस म्हणून भारत बायोटेकच्या इंट्रानेझल COVID-19 लसीच्या फेज III क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता दिलीये. वेगवेगळ्या नऊ ठिकाणी ही चाचणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला, DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला इंट्रानेसल लसीच्या चाचणीसाठी तत्वतः मान्यता दिली.