मुंबई : उन्हाळ्यात बाजारामध्ये कैऱ्या सर्वत्र उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत काही शितपेय पिण्याची इच्छा असते, तेव्हा कैरीचे पन्हे त्यावर एकमेव उपाय आहे. आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते. उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात. कैरीपासुन पन्हे तयार करायचे तीन प्रकार खालील प्रमाणे :-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहित्य
५०० ग्रॅम कैऱ्या, मीठ, गूळ, वेलची पूड चवीप्रमाणे
कृती - सर्व प्रथम कैरीची साल काढून घ्या. थंड झाल्यानंतर फोडी करून स्वच्छ पाण्यात धूवून घ्या. कैरी शिजवून घ्या. मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. नंतर त्यात मीठ आणि गूळ चवीप्रमाणे घालून, वेलचीची पूड घालून निट एकत्रित करून घ्या.    


साहित्य
५०० ग्रॅम कैऱ्या, साखर, १ चमचा मीठ
कृती - सर्व प्रथम कैरीची साल काढून घ्या. थंड झाल्यानंतर फोडी करून स्वच्छ पाण्यात धूवून घ्या. कैरी शिजवून घ्या. मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. कैरीचा गर काढून घ्या. नंतर निघालेल्या गराच्या अडीच पट साखर घाला. फ्रिजमध्ये ठेवल्यास फार काळ जिकते.


साहित्य : 
५०० ग्रॅम कैऱ्या, चवीप्रमाणे साखर, मीठ, १ चमचा केशरी रंग, वेलची पूड, चुरा केलेला बर्फ.
कृती - शिजवलेली कैरी आणि साखर यांचे मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या. त्यात थोडे केशरी रंग, वेलची पूड, थंडगार पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार बर्फ एकत्र करावे. व्यवस्थित ढवळून सर्व्ह करावे.