Throat Infection Home Remedies: सध्या हवामानात दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहेत. अनेकदा या हवामानामुळे प्रकृती खराब नसतानाही खालावली जाते. मग अशावेळेस आपण डॉक्टरकडे धाव घेतो. वेळीच योग्य काळजी न घेतल्यामुळे या त्रासांना सामोरे जावं लागतं. हवामानात होणारा बदलांमुळे घसा खवखवणे, खराब होणे किंवा दुखू लागणे अशा समस्या उद्भवतात. किरकोळ खोकला आणि घसादुखी असल्यास आपण घरगुती उपाय करु शकतो. पण अनेकदा वेळीच योग्य काळजी न घेतल्याने घशात संसर्ग होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. तुम्ही देखील घशातील संसर्गामुळे त्रस्त आहात तर घरगुती उपाय करणे खूप सोयीचे आहे. घरगुती उपाय केल्यास समस्या हाताबाहेर जाण्याआधीच आटोक्यात आणली जाते. म्हणून अशावेळेस दुर्लक्ष न करता अधिकची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या घरगुती उपायांमुळे घशातील वेदना, खोकला, खवखवणे आणि जळजळ होण्याची समस्या देखील दूर करते.



घशाच्या संसर्गावर घरगुती उपाय | Throat Infection Home Remedies 


हळद (Turmeric)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून गुळण्या करा. हळदीतील औषधी गुणधर्म असल्यामुळे घशातील सूज आणि खवखव दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. हळदीत अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे घशातील संसर्ग लवकर बरा होण्यासाठी मदत करतात.



मिठाचे पाणी (Salt Water)


आपल्याला नेहमीच डॉक्टर आणि घरातील मोठी माणसं घसा दुखायला लागल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करायला सांगितले जाते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास आत साचलेला कफ वितळेल. जोपर्यंत घशाचा संसर्ग जात नाही तोपर्यंत नियमितपणे गुळण्या केल्यास तुम्हाला लवकरच आराम मिळेल. 



चहा (Tea)


तुम्ही घशाच संसर्ग झालेल्या वेळेत कोरा चहा सकाळचा घेतल्यास तुमच्या घशाला आराम मिळू शकतो. आल्याचा चहा, दालचिनीचा चहा किंवा लवंग चहा घशाच्या संसर्गावर सर्वात प्रभावी आहे. याशिवाय कॅमोमाइल टी, ग्रीन टी आणि पेपरमिंट टी देखील पिऊ शकता.



मध (Honey)


मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत ज्याचा फायदा होतो. घशाच्या संसर्गामध्ये मध खाणे फायदेशीर आहे. तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून नियमितपणे पिलात तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. 



मेथी (Fenugreek)


घशातील जंतुसंसर्ग आणि सूज दूर करण्यासाठी मेथीचे दाणे पाण्यात उकळून गाळून प्यावे. मेथीत वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे घशात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास वेळीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे.