#DeepSleep टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाही? वापरा या टिप्स, शेवटची टीप आहे भन्नाट
Tips for sound sleep : सध्या आपल्या सर्वांना रात्री उशिरापर्यंत जागायची वाईट सवय लागली आहे. अनेकांना सोशल मीडियामुळे, त्यावरील रिल्समुळे, अनेकांना घरच्या टेन्शनमुळे किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्री झोप येत नाही. अशात रात्री वेळेत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घेऊया.
Tips For Deep Sleep : तुमचे ताण तणाव हे तुमचा मेंदू तुमच्या शरीराआधीच आधीच जाणतो. ही प्रक्रिया एवढ्या जलद गतीने होते की याबाबत तुम्हाला समजत सुद्धा नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही उंचावरून खाली पाहताना तुमच्या काळजाचा ठोका चुकतो. तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर तुमचं हृदय धडधडतं. जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रचंड उत्सुक असाल तर तुमच्या पोटात गोळा येतो. तुम्ही घरच्या किंवा ऑफिसच्या टेन्शनमध्ये असाल, तर तुम्हाला झोप येत नाही. मेंदू तुमची मानसिक स्थिती आधीच जाणून त्यावर रिऍक्ट करत असतो. अशात या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला टेन्शनमुळे रात्री झोप लागत ( tension and sleepless night) नसेल, तर काय करावं याबाबत सांगणार आहोत. या पाच टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
रात्री कॅफिन किंवा अल्कोहोलिक घेणं
कॅफेन किंवा अल्कोहोल तुमच्या झोपेमध्ये अडथळा ( avoid caffeine and alcohole) आणतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे जी तुमच्या मेंदूला थकवा जाणवत नाही. हेच संकेत नंतर मेंदू संपूर्ण शरीराला पाठवतो. म्हणूनच तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे तुम्हालाही रात्री कॉफी ( drinking coffee at night) प्यायची किंवा मद्यसेवनाची सवय असेल तर ती बदललेली बरी. याने तुम्हाला रात्री चांगली झोप येण्यास मदत होईल.
हर्बल टी ठरेल फायद्याची
स्लिप फाऊंडेशननुसार जर तुम्हाला रात्री झोप लागण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही हर्बल टी घेऊ (Hearbal Tea) शकतात. यामध्ये विविध प्रकार मोडतात. लव्हेंडर, लेमन बाम, केमोमाईल फ्लेव्हर्स तुमचं शरीर रिलॅक्स ( Bod relaxation) करण्यास मदत करतात. याने तुम्हाला लवकर आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
रात्री अचानक जाग येणं
टेन्शनमुळे तुम्हाला रात्रभर झोप येत नसेल किंवा मध्यरात्री अचानक तुम्हला खडबडून जाग येत असेल तर एक सोपा उपाय करा (sleepless night) . बेडवर लोळत पडून झोपेची वाट पाहण्यापेक्षा काहीतरी अतिशय बोरिंग काम करा. याने तुम्हाला थकल्यासारखं वाटेल आणि मेंदू शरीराला झोपेचे संकेत देईल.
टेन्शनची कारणं नोट करा
तुम्हाला चांगली झोप लागावी असं वाटत असेल तर तुच्या समस्या एका पेपरवर लिहत चला ( Write your problems) . तुम्ही एकदा तुमचे प्रॉब्लेम्स पेपरवर लिहायला सुरुवात केली की तुमचा मेंदू तुम्हाला टेन्शन ऐवजी सोल्युशन्स सुचवेल. याचा फायदा म्हणजे तुम्ही रात्रभर चिंतेत घालवणार नाहीत. तुम्हाला रात्री चांगली झोप येण्याचं त्याचा फायदा होईल.
tips for getting sound and deep sleep at night if you have many thoughts in mind