मुंबई : उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. तर आरोग्याच्याही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा त्रास जास्त कोणाला जाणवत असेल तर तो वर्कींग वुमन्सना. उन्हाच्या तडाख्यात फ्रेश दिसणे, हे मोठे आव्हान असते. पण काही टिप्सच्या साहाय्याने तुम्ही त्वचेच्या समस्या दूर ठेऊ शकता आणि नक्कीच फ्रेश दिसू शकता. तर या काही टिप्स खास वर्कींग वुमन्ससाठी....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. उन्हाळ्यात तुम्ही जितक्या वेळ्या चेहरा धुवाल तितके चांगले. शक्य असल्यास उन्हाळ्यात तुळस आणि कडूलिंब युक्त फेसवॉश वापरा. त्यामुळे त्वचेच्या अतिरिक्त तेलकटपणापासून सुटका मिळेल. पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. कडूलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होऊन चमकदार होण्यास मदत होईल. 


२. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनी मॅट मॉश्चराईजरचा वापर करावा. मात्र कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असेल तर सन्सक्रीमचा अवश्य वापर करा. आठवड्यातून तिनदा स्क्रबचा वापर करा. त्यामुळे मृत त्वचा निघून त्वचा चमकदार होण्यास मदत होते. 


३. आठवड्यातून एकदा फेसमास्क जरुर वापरा. अनेकदा कामाच्या नादात आपण त्वचेकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे चेहरा सुंदर व प्रेश दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा फेसमास्क अवश्य लावा. त्यामुळे त्वचा हेल्दी राहिल.


४. शक्य असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही लाईट मेकअप करु शकता. त्याचबरोबर वेट टिश्यू सोबत ठेवा. घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी बॉडी स्प्रे कॅरी करा.