नवी दिल्ली : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कमी वयात आजारांची जडण होते. याला आपली बैठी, बदललेली जीवनशैली, अवेळी खाणे, अपूरी झोप, इंटरनेटचा अधिक वापर अशा अनेक सवयी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर ताण-तणाव, स्पर्धा या गोष्टींचीही त्यात भर पडते. अशावेळी स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे.


शरीराला आराम द्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम शरीर-मनावर होत असतो. त्यासाठी वेळ असेल तेव्हा शरीराला आराम द्या.


तणावाला करा बाय-बाय


ताण-तणावामुळे अनेक शारीरिक-मानसिक समस्या उद्भवतात. त्यामुळे ताण हाताळायला शिका. त्यासाठी योगसाधना, ध्यानधारणा तुम्ही करू शकता.


ऑफिसमध्ये असतानाही शरीराकडे लक्ष द्या


तुमच्या बसण्याची स्थिती तपासा. खुर्चीवरून थोड्या वेळाच्या अंतराने उठून फिरत जा. डोळ्यांवर पाणी मारा. वेळेवर जेवा. भरपूर पाणी प्या.


स्वतःवर विश्वास ठेवा


प्रत्येक काम एक आव्हान असते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटा. पण त्याचा ताण येऊ देऊ नका. तसंच स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखू नका किंवा स्वतःला कमजोर समजू नका.


सकारात्मक विचार


सर्वात महत्त्वाचे आहेत सकारात्मक विचार. त्यामुळे तुम्ही स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगू शकता. जीवनाला दिशा देऊ शकता. त्यामुळे वेळीच सकारात्मक विचारांचे महत्त्व जाणा आणि त्याची सवय लावून घ्या.