मुंबई : केसांच्या पोतानुसार योग्य हेयर ब्रश निवडणे काहीसे कठीण आहे. सगळेच हेयर ब्रश सारखेच वाटतात. मग त्यातून अचूक हेयर ब्रश निवडण्यासाठी काही टीप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे केस सरळ (स्ट्रेट) असतील आणि तुम्हाला त्यांचा व्हॉल्युम वाढवायचा असेल तर राऊंड, boar-bristle ब्रश वापरा. जो नायलॉनच्या ब्रशपेक्षा जास्त सॉफ्ट असतो आणि त्यामुळे स्प्लिट एंड्सला आळा बसतो. 


वेव्ही हेयर्ससाठी:


वेव्ही केस ब्लो ड्राय करायचे असल्यास nylon-bristle ब्रशचा वापर करा. 


कर्ली हेयर्ससाठी:


कर्ली आणि जाड केसांसाठी मोठ्या दातांची फणी वापरा. म्हणजे केस फ्रिझी न होता व्यवस्थित दिसतील. 


जाड आणि लांब केसांसाठी:


जाड व लांब केसांसाठी paddle ब्रशचा वापर करा. हा ब्रश सगळ्या प्रकारच्या केसांसाठी विशेषतः जाड केसांसाठी उत्तम ठरतो.


शॉर्ट केसांसाठी:


केस लहान असल्यास लहान राऊंड ब्रश उत्तम ठरेल. त्यामुळे केस मऊ आणि खालून गोलाकार राहतील.