मुंबई : आजकाल प्रत्येक लहान सहान गोष्टीचे सेलिब्रेशन पार्टी करुन केले जाते. पार्टी म्हटलं की मद्यपान होतेच. रात्रभर पार्टीत कितीही मज्जा वाटत असली तरी त्यानंतर येणारी सकाळ नकोशी होते. कारण हॅंगओवर. पण हा हॅंगओवर पळवून लावयला मदत करतील या काही खास टिप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. नशा उतरण्यासाठी एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी प्रत्येक तासाला भरपूर पाणी प्या. फायदा होईल. त्याशिवाय अंडे खाल्याने लिव्हर लवकर रिकव्हर होईल.


#2. दोन कप कॉफी रिप्रेश करेल.


#3. कोणत्या न कोणत्या कामात व्यस्त राहिल्याने हॅंगओवरचा त्रास होणार नाही.


#4. अतिरिक्त मीठ शरीरातील तरल पदार्थांना शोषून घेतं. त्यामुळे नशा उतरण्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या.


#5. डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी टी बॅग्स १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.


#6.ओट्स खा. हे पचायला हलके असून यामुळे तुमचा मूडही ठिक होईल.