मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत समुद्रावर फिरायला जावेसे वाटते. पण वाढत्या गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आहारत बदल करण्याबरोबर इतर काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी खास टिप्स. या टिप्सने तुमच्या सुट्ट्या मजेत घालवा. 


फळांची स्मूदी आणि मिल्कशेक प्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्याच्या दिवसात फळांनी बनलेली स्मूदी आणि मिल्कशेक प्या. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. हंगामी फळे खाणे लाभदायी असते. उन्हाळ्याच्या हंगामात अनेक चविष्ट फळे येतात. आंबा, फणस, टरबूज, सफरचंद, शहाळं ही फळे अवश्य खा. किंवा यापासून स्मूदी किंवा शेक बनवून प्या. त्यासाठी फळे, दूध, साखर आणि मध एकत्र मिक्सरमध्ये वाटा. तुमचे शेक तयार होईल.


भरपूर सलाड खा


हंगामी फळे, भाज्या यापासून बनलेले सलाड आरोग्यदायी ठरते. त्यामुळे दररोज आहारात सलाडचा समावेश करा.


आरामदायी व्यायाम करा


उन्हाळ्याच्या दिवसात व्यायाम करणे कठीण होते. पण पोहणे काहीसे आरामदायी वाटते. त्यामुळे पोहण्याचा व्यायाम उन्हाळ्यात केल्यास फायदा होईलच पण त्रासही होणार नाही. त्याचबरोबर सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी जा.


उन्हापासून संरक्षण करा


उन्हाळ्यात सूर्यकिरणे अधिक प्रखर होतात. त्यामुळे यापासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात जास्त बाहेर फिरु नका. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर अवश्य करा. शरीराला थंडावा मिळण्यासाठी रसदार फळे खा. भरपूर पाणी प्या. टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा.