मुंबई : उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे सनबर्न. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकदा बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स केले जातात. पण वाढत्या उन्हाचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ लागतो आणि त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी काही सोप्या उपयांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. पहा कोणते आहेत ते उपाय...


थंड पाण्याने अंघोळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनबर्न झाले असल्यास दिवसातून कमीत कमी दोनदा थंड पाण्याने अंघोळ करा. याशिवाय तुम्ही ओल्या टॉवेलचा देखील वापर करु शकता. जर तुम्हाला खाज, इंफेक्शन ही समस्या असल्यास तुम्ही सनबर्न झालेल्या जागी ओला टॉवेल ठेवू शकता. त्यामुळे सनबर्नच्या समस्येवर आराम मिळेल. अंघोळीनंतर मॉश्चराईजर अवश्य लावा. त्यामुळे त्वचेतील आद्रता टिकून राहील.


मॉश्चराईजर


उन्हाळ्यातही शरीर मॉश्चराईजर लावा. कोरफड, काकडी युक्त मॉश्चराईजर वापरा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला थंडावा मिळतो. 


पाणी प्या


उन्हाळात भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहाइड्रेशनची शक्यता वाढते. म्हणून शरीर हाइड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.


उन्हापासून संरक्षण करा


उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळा. यावेळी उन्हाचा प्रखर अधिक असतो. त्यामुळे सनबर्नचा धोका वाढतो. 


कॉटनचे कपडे घाला


उन्हाळ्यात शक्यतो कॉटनचे कपडे घाला. कॉटन कमी प्रमाणात ऊन शोषून घेतो. तसेच अंगभर कपडे घालणे फायदेशीर ठरेल.