मुंबई : कॉलेजमधील आयुष्य हे नवी आव्हानं, जोश, उत्साह, मज्जामस्ती आणि त्याचबरोबर काही समस्यांना, ताणालाही सामोरे जावे लागते. कॉलेज लाईफ अत्यंत रोमांचक वाटत असली तरी अनेक मुलांना या काळात खूप दबाव जाणवतो. हा ताण, दबाव वाढल्यास तो घातक धरू शकतो. म्हणून या समस्येत आणि नव्या आयुष्याच्या लढाईत तुम्ही याप्रकारे मुलांची मदत करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# अभ्यास, कॉ़लेजच्या पहिल्या वर्षातच मुलांना त्याचे महत्त्व समजवून द्या. कारण नवा कोर्स निवडल्यानंतर काहीसा दबाव, ताण त्यांना जाणवतो. त्यामुळे त्यांना सकारात्मक विचार द्या. लहान लहान गोष्टीतून प्रेरणा द्या.


# तणाव दूर करण्यासाठी योग्य प्लॅन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासाचे, विषयांचे नीट प्लॅनिंग करा.


# कॉलेजच्या प्रोफेसर्सची आदरपूर्वक बोलणे आणि त्यांच्याशी चांगले संबंध बनवल्याने अर्ध्या समस्या दूर होतात. याचे महत्त्व कालांतराने तुम्हाला जाणवेल.


# कोर्स पूर्ण झाल्यानंतर काय करायचे, हे लक्ष्य मुलांच्या डोक्यात स्पष्ट असायला हवे. त्यासाठी वारंवार त्याला त्याच्या लक्ष्याची जाणीव करुन देत रहा. अनेकदा आपले लक्ष्य, प्लॅन्स यामुळे मुले संभ्रमात पडतात. अशावेळी त्यांच्यासोबत रहा आणि त्यांना स्पष्ट व व्यवहारीक सल्ला द्या.


# लोकांना भेटल्याने, नवे फ्रेंड्स बनवल्याने तणावमुक्त राहण्यास मदत होते. फ्रेंड्ससोबत मज्जामस्ती केल्याने, फिरल्याने फ्रेश, आनंदी वाटते. 


# शिस्तीची बाबतीत अतिशय कठोर राहू नका. मुलांना कॉलेज लाईफ एन्जॉय करु द्या.