मलेरिया टाळायचाय मग फॉलो करा या टिप्स...
तुमच्या आमच्या पैकी अनेकांनी मलेरियाचा अनुभव घेतला असेल.
मुंबई : काही दिवसांपूर्वी वर्ल्ड मलेरिया डे होता. तुमच्या आमच्या पैकी अनेकांनी मलेरियाचा अनुभव घेतला असेल. हा आजार कोणत्याही वयात होत असून यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून मलेरियापासून बचाव करण्यासाठी खास टिप्स...
#1. आपण सर्वच जाणतो की मलेरिया हा संक्रमित एनोफेलेस मच्छर चावल्याने होतो. त्यामुळे डासांपासून सुरक्षा देणारे क्रिम किंवा स्प्रे लावा.
#2. कुंड्या, बादली, टाकी यात पाणी अधिक काळ साठवून ठेवू नका. घरच्या आजूबाजूला खोल ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नका.
#3. खूप डास असलेल्या ठिकाणी नेहमी फुल कपडे घाला.
#4. मलेरियापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. त्यासाठी आयर्न आणि इतर पोषक घटकांचा आहारात समावेश करा. जंकफूड, तळलेले पदार्थ खाणे टाळा.
#5. मच्छरदाणीचा वापर करा.
#6. संध्याकाळच्या वेळेस दरवाजे, खिडक्या बंद ठेवा.
मलेरियावर घरगुती उपाय
काळीमिरी
ताप दूर ठेवण्यासाठी ३,४ काळीमिरी आणि कांद्याचा रस काढा. दिवसातून दोन-तीनदा तो रस प्या.
मनुका
१० ग्रॅम मनुका आणि आलं पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर ते थंड करा. यामुळे खूप आराम मिळेल.
दालचिनी
१ चमचा दालचिनी, मध आणि अर्धा चमचा काळीमिरी पावडर पाण्यात घालून उकळवा. मलेरियाचा ताप दूर करण्यासाठी थंड करुन ते प्या.
फटकी
फटकी तव्यावर भाजून त्याची पावडर करा. हे ताप येण्यापूर्वी खा.