मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेकांना भटकंतीचे वेध लागतात. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला बाहेर पडतात. पण काही जणांना प्रवासात मळमळण्याचा,उलटीचा त्रास होतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेणं राहून जाते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासात मळमळण्याचा त्रास कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय तुम्ही नक्की आजमवू शकता.  


आल्याचा तुकडा चघळा - 


आल्याचा तुकडा पचनाचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. याकरिता घरगुती आलेपाक, सुंठवडा, आवळा- आल्याचं मिश्रण चघळणं फायदेशीर आहे. आल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !


आवळा - 


उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पित्ताचा त्रास असणार्‍यांमध्ये प्रवासात उलटीचा त्रास वाढू शकतो. अशावेळेस मधात घोळवलेला सुका आवळा किंवा आवळा कॅन्डी चघळणं फायदेशीर आहे.  


वेलची -


सुगंधी वेलची नैसर्गिकरित्या पचनाचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करते. सोबतच त्याच्या मंद सुगंधामुळे उलटी होण्याची भीती, मळमळ कमी होते. 


पुदीना तेल  


पुदीना तेल रूमालावर घ्या. प्रवासादरम्यान हा रूमाल सुंगत राहिल्याने त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 


कारने प्रवासाला निघाल्यास उलटी किंवा मळमळीचा त्रास टाळण्यासाठी शक्यतो फ्रंट सीटवर बसा. सोबतच अंताक्षरी किंवा इतर मजेशीर अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घ्या म्हणजे प्रवासात तुमचं लक्ष इतर ठिकाणी आपोआपच गुंतलेलं राहिल. 


लवंग -  


वेलचीप्रमाणेच लवंगही फायदेशीर ठरते. लवंग चघळल्याने मनातील भीती कमी होते. पचनाचा त्रास आटोक्यात राहतो. 


ओवा - 


अपचनामुळे पित्त झाले असल्यास प्रवासात उलटीचा त्रास टाळण्यासाठी ओवादेखील फायदेशीर ठरतो. 


कोणत्या गोष्टी टाळाल ? 


प्रवासात त्रास होऊ नये असे वाटत असेल तर प्रवासादरम्यान पुस्तकं वाचणं, मोबाईलचा अतिवापर करणं टाळा. यामुळे चक्कर येऊ शकते. 


प्रवासाला निघण्यापूर्वी उलटी  होईल या भीतीने रिकाम्यापोटी निघू नका. सुकी बिस्किटं, हलका आहार करूनच बाहेर पडा. तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार पदार्थ खाणं टाळा. तिखटाचे पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो.