सनस्क्रीन लावताना ही काळजी घ्या...
सनस्क्रीन लावणे या उन्हाळ्याच्या दिवसात अपरिहार्य झाले आहे.
मुंबई : सनस्क्रीन लावणे या उन्हाळ्याच्या दिवसात अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे सनबर्न, टॅनिंग त्याचबरोबर अनेक त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर सनस्क्रीनच्या नियमित वापरामुळे त्वचा अधिक चमकदार आणि टवटवीत राहते. त्यामुळे तुम्ही जर सनस्क्रीन लावत नसाल तर त्याचा वापर सुरु करा. सनस्क्रीनमुळे सुर्याच्या हानिकारण किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल. त्वचेवरील डाग, स्पॉट दूर होण्यास मदत होईल. फक्त सनस्क्रीन लावण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.
बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. कारण सनस्क्रीनचा असर सुरु होण्यास तितका अवधी लागतो. तसंच २० मिनिटे आधी लावल्यास त्याचा दुप्पट फायदा मिळेल.
सनस्क्रीन लावताना क्रिम त्वचेवर जोरजोरात रगडू नका. अगदी हलक्या हाताने एखाद्या थराप्रमाणे क्रिम त्वचेवर लावा.
उन्हातून आल्यानंतर लगेचच चेहरा धुवू नका. त्यामुळे पेशींना तापमानाशी जुळून घेण्यास वेळ मिळत नाही. म्हणून काही वेळ थांबून चेहरा धुवा.
शक्य असल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडू नका. कारण दुपारी ऊन खूप प्रखर असते. त्यामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन, सनबर्न यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते. बाहेर पडण्याची गरज भासल्यास पूर्ण तयारीने बाहेर पडा.
टॅनिंग झाल्यास लगेचच कोणतीही ट्रिटमेंट घेऊ नका. टॅनिंग झाल्यानंतर ८-१० दिवसांनी ट्रिटमेंट घ्या. चेहऱ्याच्या त्वचेला थंडावा देणाऱ्या गोष्टींचा वापर करा.
सनस्क्रीन लावल्यापूर्वी त्वचेवर मॉश्चराईजर लावा. सनस्क्रीनचा अधिक फायदा मिळेल.
सनस्क्रीनमुळे त्वचेचे अजिबात नुकसान होणार नाही, असा दावा करु शकत नाही. म्हणून बाहेर पडताना छत्री किंवा स्कार्फचा वापर करा.