तिशीनंतरही तरुण दिसण्यासाठी खास ५ टिप्स...
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात.
मुंबई : वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात. तर त्वचेचा रंगही बदलत जातो. पण ३० ओलांडल्यानंतरही आपण सुंदर दिसावे आणि मुख्य म्हणजे तरुण दिसावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तारुण्य टिकवण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील...
# सुर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. त्वचा टॅन होते. म्हणून उन्हात बाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी एसपीएफ-30 असलेले सनस्क्रीन जरुर लावा. त्यामुळे त्वचा टॅन होण्यापासून तसेच इतर समस्यांपासून त्वचेचे नुकसान होणार आहे.
# त्वचा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लिंजरचा वापर करा. त्यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. केमिकलयुक्त प्रॉडक्सचा वापर करणे टाळा. वाढत्या वयात त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सौम्य प्रॉडक्स वापरा.
# शरीर व त्वचेत आर्द्रता टिकून ठेवण्यासाटी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी रोज सुमारे ३-४ लीटर पाणी प्या. सात्विक आहार घ्या. कोलेजन आणि व्हिटॉमिन ई मुळे त्वचा स्वस्थ राहते. बदाम आणि अक्रोट खाणे लाभदायी ठरते. कारण त्यात ओमेगा ३ असते.
# स्वस्थ आणि चमकदार त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून झोपेचे गणित सांभाळा.
# नियमित व्यायाम अवश्य करा. ३० शीनंतर त्वचा सैल होऊ लागते. रोज व्यायाम केल्याने त्वचेला घट्टपणा येतो आणि शरीरही स्वस्थ राहते.