उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही? दिवसाला किती सेवन करावं? न्यूट्रिशनिस्टचा हा सल्ला ठरेल फायदेशीर
संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे...ब्रेड ऑम्लेट, उकडलेले अंडे, पनीर ऑम्लेट आणि एग करी खायला कोणाला आवडत नाही? पण उन्हाळात अंडे खायला पाहिजे का?
Eat Eggs During Summer : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे...अंडे हा ताकदचा खजिना आहे. भरपूर प्रमाणात प्रथिन आणि तेही स्वस्त दरात आपल्या शरीरासाठी मिळतो. त्याशिवाय अंड्यातून व्हिटॅमिन बी 2 (रिबोफ्लेविन), व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, सेलेनियम आणि आयोडीन, व्हिटॅमिन ए आणि फोलेट, बायोटिन, पॅन्टोथेनिक ऍसिड आपल्या मिळतो. त्यामुळे प्रत्येक मांसाहारी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अंडी आवडीने खातात. (To eat eggs in summer or not How much to consume per day This advice from a nutritionist will be beneficial)
पण उन्हाळ्यात अंडी खायला हवी का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याबद्दल आज तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. अंडी ही निसर्गीक उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही हरकत नाही. मात्र मग उन्हाळ्यात अंडी खायला पाहिजे का? शिवाय ती किती प्रमाणात खाल्ली पाहिजे?
उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही?
न्यूट्रिशनिस्ट निक्की सागर यांनी सांगितलंय की, 'अंडी हे सुपरफूड असून ते अनेक घरातील लोकांच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. अंडी रोज खाल्ली जातात. उन्हाळ्यात अंडी खाणे त्यांच्या गरम स्वभावामुळे टाळावे असा एक समज अनेकांमध्ये आढळून येतो. त्यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
निक्की सागर सांगतात की, 'ऋतू कोणताही असो, मर्यादित प्रमाणात अंडी खाणे टाळायला पाहिजे. अंडी आपल्याला उष्णतेचा सामना करण्यास मदत करते. अंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात जे आपले एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करतं. 'दमट हवामानात अंडी खाण्याचा परिणाम व्यक्तीपरत्वे बदलत असतो. काही लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यात अंडी खाणे चांगल नाही शिवाय त्यामुळे पचनक्रियावर परिणाम होतो.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर प्रथिनांचं जास्त सेवन टाळणे ही चांगली सवय आहे. कारण प्रथिनांचं सर्वाधिक सेवन आपल्या चयापचयवर परिणाम करतं. तरीदेखील तुम्हाला प्रथिनांसाठी अंडी खायची असेल तर तुम्ही अंड्याचा पाढंरा भाग खावा. अंडी आपल्या शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखते जे उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक मानले जाते. कारण शरीरात द्रव नसल्यामुळे निर्जलीकरण आणि इलेक्ट्रोलाइटिक असंतुलन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढण्याची भीती असते. अंड्यांमध्ये उच्च घनतेचे लिपोप्रोटीन्स असतात जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. त्याशिवाय हृदयाशी संबंधित विकार दूर ठेवत हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवतात.
दररोज किती अंडी खायला पाहिजे?
सागर म्हणतात, 'आपण अंड्यांचा वापर दररोज 2 अंड्यांपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे. हे सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरतं. याशिवाय आहारात पाणी, फळं आणि भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करायला पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)