मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या तब्येतीची योग्यप्रकारे काळजी घेणं कठीण होतं. कामात अतिशय व्यस्त असल्याने अनेक जण आरोग्याकडे तितकंस नीटपणे लक्ष देत नाही. अशावेळी आरोग्याकडे लक्ष न दिल्याचा परिणाम आपल्या मूडवर, मानसिक स्वास्थ्यावर होत असतो. आरोग्य बिघडल्यास आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडत असते. परंतु अशावेळी घरातील काही पदार्थ आपला मूड काही प्रमाणात ठिक करण्यासाठी मदत करतात. 


चॉकलेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक संसोधनातून असं समोर आलं आहे की, चॉकलेट खाल्ल्याने आपल्या शरीरात कॉर्टिसोल योग्य प्रमाण राहतं. कॉर्टिसोल हे एक प्रकारचं हार्मोन आहे, जे तणाव कमी करण्यास मदत करतं. त्यासोबतच चॉकलेट थकवा कमी करण्यासही मदत करतं. चॉकलेट कमी रक्तदाब असणाऱ्यासाठीही फायदेशीर आहे.


मध 


मध शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर असतं. यासोबतच मध मानसिक तणावही कमी करतं. असं मानलं जातं की, मध साखरेपेक्षा अधिक गोड आणि चविष्टही असतं. त्यामुळे मध खाणं शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे.


दही 


दही खाणं सर्वांसाठी लाभदायक आहे. दही मेंदू, शरीर शांत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अनेकदा बाहेर जाताना दही-साखर खाणं शुभ मानलं जातं. दही तणाव कमी करण्यासही गुणकारी ठरतं.


टॉमेटो


टॉमेटोमध्ये लायकोपीन नावाचं अन्टिऑक्सिडेंट असतं. जे डोकं शांत ठेवण्यास मदत करते. तसंच दररोज जेवणातही टॉमेटो खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.