मुंबई : हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या विचित्र जीवनशैलीसोबतच तंबाखूची सवय तरुणांना हार्टअटॅकच्या माध्यमातून मृत्यूकडे खेचून घेऊन जाताना आढळतेय. 'एम्स'सहीत देशभरातील ५० सेंटर्सच्या माध्यमातून केलेल्या रिसर्चच्या माध्यमातून समोर आलीय. जवळपास ४० टक्के युवकांच्या हार्टअटॅकचं कारण तंबाखू असल्याचं या संशोधनात समोर आलंय. 


तरुणांमध्ये हार्टअटॅकची समस्या वाढत चाललल्यानं भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ५० सेंटर्सच्या साहाय्यानं संशोधन करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनातून हार्टअटॅकमागची अनेक कारण समोर आलीत.


अनेक हार्टअटॅक पीडित तंबाखू, सिगारेट आणि गुटख्याचं सेवन करत असल्याचं या संशोधनातून समोर आलं. अशा तरुणांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अधिकांश वेळा ब्लॉकेज नसतं... धमन्या योग्यरित्या काम करत असतात. परंतु, तंबाखूच्या दुष्प्रभामुळे एखाद्या जागी रक्ताची गाठ तयार झाली तर हृदयाचे विकार संभावतात. तणाव आणि फास्ट फूड हेदेखील तरुणांमध्ये हृदयाचे धोके वाढवताना दिसतात.