मुंबई : सध्या केरळमध्ये Tomato Fever चा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. आतापर्यंत 100 हून अधिक जणं या आजाराला बळी पडल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे हा फिव्हर लहान मुलांना अधिक संसर्गित करतो. पण आता याच दरम्यान अनेकांना प्रश्न पडतो की हा आजार टोमॅटो खाल्ल्याने होतो का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, Tomato Fever चा आणि टोमॅटो खाण्याचा यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. 


काय आहे नेमका टॉमेटो फीवर?


टोमेटो फीवरला टोमेटो फ्लू असंही म्हटलं जातं. हे एक व्हायरल इन्फेक्शन असून 5 वर्षांच्या खालील बालकांना याचा संसर्ग होतो. ज्या बालकांना याचा संसर्ग झाला आहे त्यांना रॅसेज, डिहायड्रेशन, त्वचेला खाज येणं किंवा त्वचेवर फोड येणं यांच्यासारखी लक्षणं दिसून येत आहेत.


या व्हायरल इन्फेक्शनचं नाव टोमेटो प्लू ठेवण्यात आलंय कारण, यामुळे त्वचेवर येणारे फोड हे सामान्यतः गोल आणि लाल रंगाचे आहेत. 


टोमेटो फीवरची इतर लक्षणं


  • तीव्र ताप

  • बॉडी पेन

  • थकवा

  • डिहायड्रेशन

  • जॉईंट्समध्ये वेदना होणं


टोमॅटो फीवरपासून कसं रक्षण कराल


  • जर तुमच्या मुलांमध्ये वर दिल्यापैकी कोणतंही लक्षण दिसून येत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • संसर्ग झालेल्या मुलाला केवळ उकळलेलं पाणी पिण्यासाठी द्यावं. जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

  • मुलांना त्वचेवर आलेले फोड स्पर्श करू देऊ नका

  • घरी आणि मुलांजवळ स्वच्छता राहिल याची काळजी घ्या

  • गरम पाण्याने अंघोळ करा आणि चांगला आहार घ्या