सावधान ! किचन टॉवेल जीवावर बेततोय - संशोधकांचा धक्कादायक दावा
स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर आपलं आरोग्य अवलंबून असते.
मुंबई : स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर आपलं आरोग्य अवलंबून असते. किचनमध्ये नियमित ओटा, भांडी, गॅसची शेगडी स्वच्छ ठेवण्याकडे आपला कल असतो. परंतू किचनमध्ये वावरताना आपण वापरत असलेला किचन टॉवेल आरोग्याला घातक ठरतोय हे तुम्हांला ठाऊक आहे का? नुकत्याच करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, किचन टॉवेल जेवण दूषित करण्यास कारणीभूत ठरू शकते असा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
किचन टॉवेल कसा ठरतोय घातक ?
मॉरिशस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार किचन टॉवेलचा वापर आरोग्याला घातक ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. 100 किचन टॉवेलवर करण्यात आलेल्या प्रयोगानुसार, किचन टॉवेल हा जेवण बनवताना हात पुसण्यासाठी वापरला जातो. मात्र या वापरादरम्यान पुरेशी काळजी न घेतल्याने त्यामध्ये ई - कोलाय हा विषाणू आढळतो. प्रामुख्याने नॉन वेज म्हणजेच मांसाहार बनवल्या जाणार्या किचनमध्ये हा धोका अधिक असतो.
कोणते बॅक्टेरिया वाढतात?
किचन टॉवेलच्या नमून्यांमध्ये 36.7% कोलिफॉर्म बॅक्टेरिया, उर्वरित मध्ये
एंटरोकोकस, एसपीपी, स्टेफिलोकोकस ऑरियस बॅक्टीरिया सापडले.
स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवण्यासाठी खास टीप्स
किचन टॉवेल नियमित स्वच्छ करणं आवश्यक आहे. टॉवेल सुकल्यानंतर पूर्ण कोरडा झाल्यानंतर वापरा.
कापडाऐवजी शक्य असल्यास पेपर टॉवेल वापरा.
किचनमधील गरजेनुसार प्रत्येक कामाला वेगवेगळे टॉवेल ठेवा.
मांसाहार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.