Transgender, Gay, Sex Workers Cant Donate Blood: रक्तदान (Blood Donation) हे सर्वात श्रेष्ठ दान असतं असं म्हटलं जातं. मात्र समाजातील काही वर्गातील लोकांना रक्तदान करता येत नाही. या लोकांना रक्तदान करण्यास मनाई आहे. देशातील ट्रान्सजेंडर (Transgender), समलैंगिक (Gay) आणि सेक्स वर्कर्सला (Sex Workers) रक्तदान करण्याची परवानगी नाही. याला आव्हान देताना 2 वर्षांपूर्वी या लोकांवरील रक्तदानासंदर्भातील बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर केंद्र सरकारने (Central Government) आज सुप्रीम कोर्टामध्ये आपली बूमिका मांडली आहे. या प्रकरणात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे सर्व लोक एचआयव्हीचा धोका असलेल्या गटातील असल्याचं म्हटलं आहे. तसेच या लोकांना हेपेटायटिस बीच्या संसर्गाचाही धोका असतो असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारने वैज्ञानिक कारणांच्या आधारावरच (Scientific Evidence) अशा व्यक्तींवर रक्तदान करण्यासंदर्भातील बंदी घातली आहे. केंद्र सरकारने हे उत्तर ट्रान्सजेंडर समुहाचे सदस्य असलेल्या थंगजाम सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर दिलं आहे. 


केंद्राने तयार केले नियम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गटातील लोकांना लैंगिक समस्या आणि आजारांचा धोका अधिक असतो असं मानलं जातं. त्यामुळेच सुरक्षित ब्लड ट्रान्सफ्यूजन यंत्रणेअंतर्गत काहीही झालं तर रुग्ण सुरक्षित राहिला पाहिजे याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी या व्यक्तीला सुरक्षित रक्तच पुरवण्याचा प्रयत्न असतो. रक्ताच्या माध्यमातून रुग्णाला नव्याने कोणत्याही आजाराचा संसर्ग होऊ नये असा प्रयत्न असतो. त्यामुळेच केंद्रने कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून ब्लड डोनर सिलेक्शन गाइडलाइन अंतर्गत अनेक गोष्टींचा समावेश केला असून नेमकं कोण कोण रक्तदान करु शकतं आणि कोण नाही याबद्दलही नियम तयार केले आहेत.


हे लोक करु शकत नाही रक्तदान


सज्ञान आणि सुदृढ व्यक्तीच रक्तदान करु शकतात. त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि गरोदर महिला रक्तादन करु शकत नाही. तसेच क्रॉनिकल स्किन डिसीजचे रुग्ण आणि टॅट्यू काढून 6 महिने पूर्ण झालेले नाहीत अशा व्यक्तींचंही रक्त घेतलं जात नाही. टॅटूसंदर्भातील शंका ही असते की टॅटू काढण्यासाठी वापरलेल्या सुईच्या माध्यमातून संसर्ग झाला असेल तर रक्तामधून रुग्णालाही त्या संसर्गाचा धोका निर्माण होतो. इतकच नाही तर कुत्रा चावल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन घेतलं असेल तर त्या तारखेपासून पुढील वर्षभर रकर्तदान करता येत नाही. 


एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांवरही बंदी


याच यादीमध्ये एलजीबीटीक्यू समुदायामधील लोकांचाही समावेश होतो. एलजीबीटीक्यू समुदायामधील लोकांना रक्तदान करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच या समुदायामधील एका सदस्याने यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केला. हा भेदभाव संपवावा अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून थंगजम सिंह यांनी केली. याचसंदर्भात उत्तर देताना केंद्र सरकारने रक्तदानासंदर्भातील निर्बंध आणि बंदीची यादी आणि नियमावली ही पूर्णपणे वैज्ञानिक आधारांवर तयार करण्यात आल्याचं कोर्टाला सांगितलं. आपल्या दाव्याचं समर्थन करताना वेगवगेळ्या अभ्यासांचा हवालाही कोर्टाने दिला. 


सन 1980 मध्ये रक्तदात्यांच्या नियमावलीप्रमाणे गे समुदायातील लोकांच्या रक्तदानावर बंदी घालण्यात आली. हे निर्बंध समलैंगिक पुरुष, समलैंगिक महिला आणि ट्रान्सजेंडर्ससाठी लागू करण्यात आली. जन्मत: जी लैंगिकता होती त्यामध्ये बदल करुन घेणाऱ्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात.