How To Get Rid of Motion Sickness: लांबचा प्रवास करणे हा अनेकांचा छंद असतो. कारण या काळात मजा तर येतेच, पण आयुष्यात काहीतरी नवीन शिकायला मिळते. पण हा अनुभव प्रत्येकासाठी तितका आनंददायी नसतो. कारण काहींना उलट्या होत असतात. त्यामुळे हा प्रवास नकोसा वाटतो. तसेच तुम्ही अनेकदा हे लक्षात घेतले असेल की जेव्हा अनेक लोक बस, ट्रेन, कार किंवा विमानाने इतर कोणत्याही वाहनाने प्रवास करतात तेव्हा त्यांना उलट्या, चक्कर येणे आणि मळमळ होण्याची तक्रारी असतात. त्यामुळे ते प्रवास करण्यास टाळाटाळ करतात. फ्लाइट प्रवासादरम्यान तुमच्या सीटसमोर सिकनेस बॅग (Sickness Bag) किंवा उलटीची पिशवी  (Vomit Bag) ठेवली जाते. याचा उपयोग उलट्या झाल्यास केला जातो. जर तुम्हालाही अशी समस्या भेडसावत असेल तर प्रवासादरम्यान या 3 गोष्टी बॅगेत ठेवणे चांगले. 


मोशन सिकनेसने त्रस्त असाल तर ट्रॅव्हल बॅगमध्ये या 3 गोष्टी ठेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. लिंबू Lemon
 लिंबाच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपण सर्वच जाणतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की प्रवास करताना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेमध्ये ते मदत करू शकते. लिंबू तुमच्या सामानासोबत जरूर ठेवा आणि समस्या वाढल्यास त्याचा रस सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्याच्या बाटलीत लिंबूपाणी देखील ठेवू शकता. जे तुम्हाला आराम देण्याचे काम करते.


2. केळी Banana
केळी तुम्ही सामान्य दिवसात केळी खात असाल. मात्र, प्रवासाच्यावेळी केळी बॅगेत ठेवा. या फळामध्ये पोटॅशियम  रिस्टोर करण्याची गुणवत्ता आहे आणि उलट्यापासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळते. लाँग ड्राईव्ह दरम्यान उलट्या किंवा चक्कर आल्यास केळी खा.


3. आले Ginger
आले हा असाच एक मसाला आहे, ज्याचा वापर आपण पाककृतींची चव वाढवण्यासाठी आपण करत असतो. पण प्रवासादरम्यान तुम्हाला उलटीची तक्रार असेल तर तो तुम्हाला भरपूर फायदा करु शकतो. वास्तविक, यामुळे मळमळ होण्याची समस्या टाळण्यास मदत होते आणि त्याचवेळी पोटातील जळजळ कमी करुन त्वरित आराम मिळू शकतो. तुम्ही कच्चं आलं पिशवीत घ्या आणि त्रास वाढल्यावर चघळा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आल्याची कँडी, थरमास फ्लास्कमध्ये आल्याचा चहा, आले मिसळलेले गरम पाणी देखील ठेवू शकता. यामुळे अस्वस्थतेपासून आराम मिळेल आणि उलट्या थांबतील.