एक महिना नॉन व्हेज खाणे सोडल्यास शरीरात होतात `हे` बदल, फायदा की नुकसान?
What if stop eating non veg: तब्बल एक महिन्यांसाठी मासांहर करणे सोडल्यास शरीरात होतात सकारात्मक बदल. हे बदल पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Health Tips In Marathi: कट्टर नॉन व्हेजिटेरियन (Non-Veg Food) असणाऱ्या खवय्यांना अचानक मासांहार सोडण्यास सांगितल्यावर ते सहाजिकच त्यांना अवघड जाईल. नॉन व्हेजिटेरियन व्यक्तींना एक महिन्यासाठी नॉन व्हेज न खाण्यास सांगितले तर त्याच्या शरीरात अनेक बदल होतात. मात्र हे बदल सकारात्मक असतात. जाणून घेऊया हे बदल नक्की कसे होतात.
वैदयकिय तज्ज्ञांनी एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या पालेभाज्या म्हणजेच पूर्णपणे शाकाहरी जेवण खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते. कारण शाकाहरी पदार्थांमध्ये जास्तप्रमाणात फायबर असते. त्यामुळं पचनसंस्था मजबूत होते व पोटाच्या अनेक तक्रारी कमी होतात. जर तुमचे पोट निरोगी असेल तर तुमचं संपूर्ण शरीर स्वस्थ असते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून जगभरातील खासकरुन अमेरिका आणि युरोप या शहरांतील लोक शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत.
कट्टर मासांहारी लोक हळूहळू शाकाहारी जेवणाकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. नैतिक, पर्यावरणातील चिंता ते आरोग्याच्या फायद्यांपर्यंत आणि शाकाहारी अन्नाची वाढती उपलब्धता, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळं मासांहारी जेवण बंद केल्यामुळं शरीराला अनेक फायदे आहेत. यात हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाइप-२ मधुमेह आणि काही प्रकारच्या कँन्सर या आजारांचा धोका कमी होतो. त्याचप्रकारे आहारात वेगवेगळ्या पदार्थाचे शाकाहारी जिन्नस समाविष्ट करा. जेणेकरुन नॉनव्हेज पदार्थातून मिळणारे पोषण तुम्हाला शाकाहारी पदार्थांमधूनही मिळेल.
तुम्ही एक महिन्यांसाठी मसांहारी जेवण बंद केल्यास तुमच्या शरीरात पाच मोठे बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल
बद्धकोष्ठतेपासून सुटका
शकाहारी पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने तुमची पाचनक्रिया सुधारते. पाचनसंस्था निरोगी असल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
वजन कमी होईल
शाकाहारी जेवणामुळं वजन कमी होण्यास मदत होते. कारण यात मासांहारी जेवणाच्या तुलनेत कमी कॅलरी असतात आणि फायबर अधिक असते. ज्यामुळं सतत भूक लागत नाही आणि कॅलरी कमी असल्याने वजनदेखील नियंत्रणात राहते.
शरीरातील सूज कमी होते
प्रोसेस मीटमुळं शरीराला सूज येण्याचे प्रमाण वाढते. नॉनव्हेज कमी खाल्ल्याने शरीरात सिस्टीमॅटिक इंफ्लेमेशन कमी होते ज्यामुळं अनेक गंभीर आजाराचा धोका कमी होतो.
कोलेस्ट्रॉल कमी होते
शाकाहारी पदार्थांमध्ये सॅच्युरेडेट आणि ट्रान्स फॅट जास्तप्रमाणात आढळतात. ज्यामुळं कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. त्यामुळं पूर्णपणे नॉनव्हेज टाळणे किंवा नियंत्रणात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो त्यामुळं हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)