Health Tips : जर दूध (milk) प्यायल्यानंतर तुमचं पोट फुगत असेल आणि गॅसचा त्रास (Gas trouble) होतं असेल तर तुम्ही नक्कीच चुकीच्या पद्धतीने दूध पिता. तसंच पाणी (water) पिताना बसून पिण्याचा सल्ला दिला जातो. यामागे तुम्हाला कारण माहिती आहे का? अनेकांना खाण्यापिण्याचा या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नाहीत. आयुर्वेदात खाण्यापिण्याबद्दल काही नियम सांगण्यात आले आहे. याचं पालन न केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


दिवसभरात रोज 8-9 ग्लास पाणी (Water) प्यायला पाहिजे असं सांगितलं आहे. अनेक समस्यांवर भरपूर पाणी पिणे हे रामबाण उपाय आहे. पण तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदात (Ayurveda) पाणी पिण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याची पद्धत...तर हो पाणी पिण्याची पण एक पद्धत आहे. जर ती नाही पाळली तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या (Many health problems) जाणवू शकतात. 


आपल्यापैकी अनेक जण घाईत आणि उभं राहून पाणी पितं. शिवाय दूध हे बसून पितात. पण या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात. (Trending News know why you should drink milk while standing and water sitting )


पाणी बसून का प्यावे?


आयुर्वेदात पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. पाणी हे कायम बसून प्यावे, कारण उभं राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला पोटाचे विकार (Stomach disorders) होण्याची भीती असते. शिवाय फुफ्फुसावरच नाही तर हृदयावरही त्याचा परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने फूड आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्याशिवाय उभं राहून आणि गटागटा पाणी प्यायल्यामुळे पोटाच्या खालच्या भागावर त्याचा मारा होता. त्यामुळे पोटाच्या आजूबाजूच्या अवयवांचं मोठं नुकसान होतं. अनेकांना सांघेदुखी आणि हर्नियाचा त्रास होऊ शकतो. शिवाय उभं राहून गटागटा पाणी प्यायल्यामुळे अॅसिडीटी, गॅस, ढेकर (Acidity, gas, belching) या समस्या जाणवतात. त्यामुळे कधीच अगदी कधीच उभं राहून पाणी प्यायला नको. त्याशिवाय कधीही पाणी ज्या ग्लास किंवा बॉटलने पित असाल तर वरून पिऊ नये. कारण असं केल्यास पाण्यासोबत तुमच्यासोबत हवा पण आतामध्ये जाते त्यामुळे पोट फुगण्याची समस्या जाणवते. त्यामुळे कधी पाणी पिताना ग्लासला तोंड लावून प्यावं.  


काय फायदे होतात


आयुर्वेदानुसार बसून पाणी प्यायल्याने पाण्याचे योग्यपद्धतीने पचन होतं. आपलं शरीर आवश्यक तेवढं पाणी शोषून घेतं आणि उरलेलं पाणी आणि विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतं. शरीरातील रक्त शुद्ध होतं. पाणी सावकाश, हळूहळू आणि बसून प्यायल्यामुळे तोंडातील लाळ ही पाण्यासोबत आपल्या पोटात जाते. त्यामुळे आपलं पोटासंबंधी अनेक विकार नाहीसे होतात. 



अच्छा आम्हाला सांगा ही झाली पाणी पिण्याची योग्य पद्धत पण तुम्हाला माहिती आहे की, पाणी जसं बसून प्यायला आयुर्वेदात सांगतात. तसंच दूध मात्र उभं राहू प्यायचं असतं हेही सांगितलं आहे. वाटलं ना आश्चर्य पण हो पाणी बसून तर दूध (milk) हे उभं राहून प्यायचं असतं. दूध प्यायल्यानंतर जर तुम्हाला पोट फुगल्यासारखं वाटत असेल किंवा तुम्हाला गॅस होऊ होतं असले तर त्यामागे दूध नाही तर दूध पिण्याची चुकीची पद्धत कारणीभूत आहे. 


दूध उभं राहून का प्यावं?


आयुर्वेदानुसार दूध हे आपल्या शरीरात थंड, वात आणि पित्त दोष संतुलित ठेवण्याचं काम करतं. जे लोक बसून दूध पितात त्यांना पचनाचा त्रास होतो. यामुळेच आयुर्वेदात रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी कोमट दूध उभं राहून पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध प्यायल्याची ही पद्धत वापरल्यास तुम्हाला दूधाचे फायदे होऊ शकतात. अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतील. 


काय फायदे मिळतात


उभं राहून दूध प्यायल्याने गुडघ्यांचा त्रास होतं नाही. स्नायूंसाठी फायदेशीर तर कर्करोगाचा धोका कमी होतो. शिवाय हृदयविकार (Heart disease) आणि उच्च रक्तदाबापासूनही (High blood pressure) तुमचं संरक्षण होतं. उभं राहून दूध प्यायल्यास तुमच्या डोळ्यांना आणि त्वचेला फायदा होऊ शकतो. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)