डायबिटीज रुग्णांसाठी `ही` हिरवी पाने ठरतेय संजीवनी, Blood Sugar राहतं कंट्रोलमध्ये
जर डायबिटीज असणाऱ्या लोकांनी आहारावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्यांना भविष्यात किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
Blood Sugar: Diabetes आजार असणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जर डायबिटीज असणाऱ्या लोकांनी आहारावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्यांना भविष्यात किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. डायबिटीज असणाऱ्या लोकांचे Blood Sugar कंट्रोलमध्ये राहणे फार गरजेचे असते. Blood Sugar कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या लोकांनी आहारात मेथीचं प्रमाण वाढवावं. म्हणजे मेथीचे पराठे, मेथी पुलाव, मेथी पकोडे खाऊ शकता. तुम्ही जर मेथी रायताचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. (trending news methi raita fenugreek for type 2 diabetes patient curd blood sugar level control in maratha)
मेथी ही डायबिटीज रुग्णांसाठी संजीवनी
मेथी ही डायबिटीज रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे, असं ग्रेटर नोएडातील GIMS हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी ZEE NEWSशी बोलताना सांगितले. मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. मेथीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असल्याचे अनेक आरोग्य अभ्यासात समोर आले आहे. हे अँटी-डायबेटिक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मेथीच्या पानांशिवाय मेथीच्या बिया या देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मेथीच्या बिया खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मेथीचा रायता खा
जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, टाइप-2 मधुमेहाचे मॅनेज करण्यासाठी एक वाटी दही खाणे खूप फायद्याचे आहे. त्यामुळे मेथीचा रायता हा मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतो. या स्पेशल रेसिपीसाठी मेथीची पाने, लसूण आणि जिरे एकत्र भाजून घ्या. त्यानंतर त्यात दही मिक्स करा. मग चवीनुसार काळे मीठ आणि चाट मसाला घाला.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)