मास्कमुळे चष्म्यावर वाफ येतेय, उपाय हवाय? हे नक्की करुन पाहा
कोरोना आला काय आणि सगळ्यांच्या जगण्याची समीकरणं बदलली काय
मुंबई : साधारण दोन वर्षांपासून कोरोनाच्याच सावटाखाली आपण सगळेजण आयुष्य जगत आहोत. कोरोना आला काय आणि सगळ्यांच्या जगण्याची समीकरणं बदलली काय... इथं बदलून गेला काय म्हणणं चुकीचं असेल. कारण, अजुनही कोरोना गेलेला नाही. कोरोनासोबत जगत असताना आपण काही सवयी आपल्याशा केल्या. (Corona)
स्वच्छतेची काळजी घेणं असो किंवा मास्क लावणं असो. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वकपणे या गोष्टींची काळजी घेतली गेली.
विषाणूपासून सुरक्षित राहण्यच्या या अट्टहासापोटी हे सर्व उपाय करत असतानाच काही अडतणीही आल्या. ज्यावर अनेकांना आजही तोडगा मिळालेला नाही.
अडचणींच्या या यादीत अग्रस्थानी येणारा मुद्दा म्हणजे, मास्कमुळं चष्म्यावर येणारी वाफ.
अर्ध्याहून अधिक जगात चष्मा असणाऱ्यांची सध्या ही मोठी समस्या. अनेकदा मास्क आणि चष्मा या दोन्ही गोष्टी एकत्र लावलं असता श्वासोच्छवास घेत असताना चष्म्यावर वाफेचा एर थर जमतो.
त्यामुळं वारंवार धुसर दिसायला लागतं. अशा वेळी सारखा चष्मा काढा, तो पुन्हा लावा यामध्ये अनेकांचे चष्मे पडून तुटलेसुद्धा.
वाफ जमतेच कशी ?
श्वसनक्रिया सुरु असताना मास्कच्या वारपामुळं श्वासातून ही वाफ बाहेर फेकली जाते. जी मास्कच्या वरच्या भागातून निसटते आणि थेट चष्म्यापर्यंत येऊन पोहोचते.
मग काय करावं ?
- मास्कमधून वाफ बाहेर येत असल्याच तिची वाट बंद करणं हा एक सोपा उपाय. मास्क स्कीन फ्रेंडली टेपच्या सहाय्यानं चेहऱ्यावर आतल्या बाजून चिकटवल्यास ही समस्या उदभवणार नाही.
- मास्क लावण्याआधी चष्म्याच्या काचा स्वच्छ धुवा. काचा धुण्यासाठी लिक्वीड किंवा साबणाच्या पाण्याचा वापरही चालेल.
साबणयुक्त पाणी बाष्प शोषून घेतं. परिणामी धुवून कोरड्या केलेला चष्मा लावल्यास हा त्रा तुलनेनं कमी होईल.
- हल्ली बरेच चष्मे अॅडजस्टमेंटनुसार असतात. त्यामुळं तुम्हीही चष्मा नीट अॅडजस्ट केल्यास, नोजपॅड काहीशी वर ठेवल्यास चष्मा हा चेहऱ्यापासून दूर राहील आणि सहाजिकच त्यावर मास्क लावलेला असतानाही वाफ जमणार नाही.