मुंबई : तुळशीचं आयुर्वेदात खूप महत्वाचं स्थान आहे. ती खूप औषधी आहे. तसेच तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे जवळ-जवळ प्रत्येक हिंदू घरात आपल्याला तुळस पाहायला मिळते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ-संध्याकाळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की तुळशीच्या कोरड्या पानांनाही खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या सुक्या पानांचे चमत्कारिक फायदे.


वाळलेल्या तुळशीच्या पानांचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे असे मानले जाते की, ही पानं तुम्ही15 दिवस भगवान श्रीकृष्णांना वाहिलीत, तर ते तुमच्यावर प्रसन्न होतील.


याशिवाय तुम्ही स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात वाळलेल्या तुळशीची पाने टाकू शकता. असे मानले जाते की, यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.


मान्यतेनुसार तुळशीची सुकलेली पानं लाल कपड्यात ठेवून तिजोरीत किंवा धनाच्या ठिकाणी ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. यासोबतच आर्थिक प्रगतीही होते.


तुळशीची सुकी पाने गंगेच्या पाण्यात टाकून घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचबरोबर घरात आनंदाचे वातावरण राहाते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)