ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल?
पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतो.
मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतो. पावसाळ्यातील वातावरण आल्हाददायक असले तरीही त्यामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. दमदार पावसानंतर अस्वच्छता वाढते परिणामी साथीचे आजार झपाट्याने वाढतात.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिकनगुनिया, डेंगी साराखे आजार पसरत आहे. रोगप्रतिकारक्षमता कमजोर असलेल्यांमध्ये व्हायरल इंफेक्शनमुळेही ताप येतो. पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांमध्ये ताप येणं हे लक्षण सामान्य असते. त्यामुळे नेमका आजार काय आहे? याची गंभीरता समजण्यासाठी वेळ लागतो. वेळीच लक्ष न दिल्यास हे आजार जीवघेणे किंवा आरोग्यावर दूरगामी परिणाम करणारे ठरतात. मग तुमच्या मनातील या आजाराबाबतचा थोडा संभ्रम कमी करण्यासाठी आम्ही तुम्हांला मदत करणार आहोत.
कसा ओळखाल डेंगी आणि चिकनगुनियाच्या तापामधील फरक?
चिकनगुनिया आणि डेंगीची लक्षण सारखीच असल्याने अनेकदा सुरूवातीला त्याचा धोका समजत नाही. डेंगीची लक्षण चिकनगुनियाच्या तुलनेत कमी दिवस आढळातात. चिकनगुनियामध्ये सांधेदुखीचे दुखणे सुमारे 3 महिने राहते. हा त्रास अधिक बळावला असेल तर दुखणे 6 महिन्यांसाठी त्रासदायक ठरते.
चिकनगुनिया 1-12 दिवस त्रासदायक ठरतो. त्याची लक्षण अधिक काळ शरीरात राहतात. डेंगीच्या त्रासामध्ये लक्षन 3-9 दिवस राहतात. डेंगीच्या त्रासामध्ये शरीरात थकवा, कमजोरी जाणवते. रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. लहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !
डेंगीची लक्षण काय ?
हात-पाय दुखणं
भूक मंदावणं
उलटी, मळमळ
तापासोबत थंडी
थकवा
अंगावर खाज येणं
डोकेदुखी
सांधेदुखी
चिकनगुनियाची लक्षणं
लिम्फ नॉडमध्ये सूज
तीव्र अंगदुखी
102 – 104 डिग्री तापमान
डोकेदुखी
सांधेदुखी, स्नायूंमध्ये दुखणे
त्वचेवर रॅश येण
उलट्या होणं