Remedies To Reduce Aging : म्हातारपण हे तर नैसर्गिक आहे पण काहीजणांचा चेहरा तरूणपणात तसा दिसतो. तारुण्यात आपल्या त्वचेच्या पेशी कडक आणि ताणलेल्या राहतात, त्यामुळे चेहरा चमकदार राहतो. वयानुसार या पेशी सैल होऊ लागतात, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामागे असे 4 पदार्थ आहेत, जे हळूहळू आपल्या त्वचेला हानी पोहोचवतात. (Unhealthy food for skin remedies to reduce aging health marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करा
दुग्धजन्य पदार्थ : दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी दुग्धजन्य पदार्थांचा वापर योग्य असल्याचे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की दुग्धजन्य पदार्थांच्या वापरामुळे त्यांना दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. आरोग्य तज्ञ म्हणतात की दुग्धजन्य पदार्थ काही लोकांना सुट होत नाहीत आणि त्यांच्या शरीरात जळजळ वाढवते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे व्यक्ती वेळेपूर्वी म्हातारी दिसू लागण्याची शक्यता असते.


लोणी : जे लोक लोणी जास्त प्रमाणात खातात त्यांचं त्वचेचं नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. याचं कारण म्हणजे वनस्पती तेल आणि ट्रान्स फॅटपासून लोणी तयार केलं जातं. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. ते त्वचेची लवचिकता आणि कोलेजन खराब करते. त्याऐवजी तुम्ही अॅव्होकॅडो ऑइल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर जेवणात करू शकता.


तळलेले अन्न : अधूनमधून तळलेले पदार्थ खाण्यास हरकत नाही, पण जर तुम्ही तळलेले-भाजलेले अन्न रोज खाल्ले तर तुमचे पोट ते पचवू शकत नाही. ते हळूहळू तुमच्या किडनी आणि यकृताला इजा करू लागते. तसेच, ते तुमच्या त्वचेलाही नुकसान पोहोचवू लागते. वेळेपूर्वी तुम्हाला थकवाही जाणवू लागतो.


पांढरी साखर : अनेक आरोग्य तज्ञांनी पांढर्‍या साखरेला पांढरे विष देखील म्हटलं आहे. पांढऱ्या साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेहाचा थेट धोका असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासोबतच कोलेजनची पातळी वाढते, ज्यामुळे शरीराची त्वचा सैल होऊ लागते आणि व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्याची चमक हळूहळू कमी होऊ लागते.