मुंबई : Tips for Healthy Life| आपले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, याकडे दुर्लक्ष केले तर अनेक आजार बळावतात. त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हीही या 5 वाईट सवयींचे बळी असाल तर लगेच सोडा. अन्यथा भविष्यात तुम्हाला आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात.


1. हिरव्या भाज्यांचे सेवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश न करण्याच्या सवयीमुळे पोट आणि शरीराच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रोज हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण  मिळते. शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा असे पदार्थ रोज खा.


2. जंक फूड टाळा


धकाधकीच्या जीवनामुळे जंक फूडचे सेवन वाढले आहे.  त्यामुळे शरीरात साखर, ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण वाढते. या गोष्टींमुळे कॅन्सर, हृदयविकार, उच्च रक्तदाब, संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांसारख्या समस्यांना बळी पडू शकतात.


3. जीवनशैलीमुळे आरोग्याची हानी


दिवसभर बसून काम करण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे स्नायू आणि शरीराचे अवयव कमकुवत होतात आणि मधुमेह, लठ्ठपणा, कमकुवत हाडे, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका वाढतो.


4. नियमित तपासणी


डॉक्टर दर महिन्याला, दरवर्षी किंवा दोन-तीन वर्षांच्या अंतराने काही महत्त्वाच्या चाचण्या करण्याची शिफारस करतात. त्यामुळे कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार यासारखे मोठे आजार वेळेत ओळखून आवश्यक उपचार सुरू करता येतात. परंतु काही लोक या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करतात.


5. पुरेशी झोप न होणे


रोज 8-9 तास झोप न घेतल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकाराचा झटका, असामान्य हृदयाचे ठोके, उच्च रक्तदाब, निद्रानाश, तणाव, नैराश्य इ. समस्या उद्भवतात.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)