मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात पाणी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. पण थंडावा देणाऱ्या बर्फाचे इतर अनेक फायदे देखील आहेत. अनेक शारीरिक समस्यांवर बर्फ फायदेशीर ठरतो. बर्फ पाण्यापासून बनलेला असतो. पण तरीही देखील बर्फाचा एक तुकडा खूप कामी येतो. पाहुया शरीराच्या कोणत्या समस्यांवर बर्फ लाभदायी ठरतो....


हायड्रेशन आणि कूलिंग इफेक्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी रोज ८-१० ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. पाण्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत करण्यास मदत होते. शरीरातील विविध भागात पोषकघटक पोहचवणे, पचनक्रियेत तसंच शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरते. बर्फाचा तुकडा खाल्यानेही हे लाभ मिळतील. बर्फामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. शरीर हायड्रेट राहते व शरीराला थंडावा मिळतो.


उलटी होत असल्यास


उलटी किंवा मळमळ होत असल्यास बर्फाचा तुकडा चावून खा. फ्रोजन आईस क्यूब्समध्ये कमी प्रमाणात साखर आणि द्राक्षाचा रस असतो. त्यामुळे शरीराला पोषकघटक मिळतात आणि पोटाला आराम मिळतो.


त्वचेसाठी


चेहऱ्यावर चमक हवी असल्यास बर्फ लावून पहा. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे, डाग, पिंपल्स दूर होण्यास बर्फ उपयुक्त ठरतो. चेहरा नेहमी टवटवीत राहतो. मात्र बर्फ थेट चेहऱ्याला लावू नका. एक मुलायम कपड्यात गुंडाळून संपूर्ण चेहऱ्यावर फिरवा. 


दुखापत झाल्यास


मुकामार लागल्यास बर्फाने शेकवणे फायदेशीर ठरते. कापल्यास किंवा काही लागल्यास रक्त थांबत नसल्यास त्यावरही बर्फ लावणे उपयुक्त ठरेल. जळजळ शांत होते. पायात किंवा त्वचेत काटा रुतला असल्यास त्या जागी बर्फ लावा. बर्फाने तो भाग सुन्न होईल आणि काटा सहज काढता येईल.


आनंदासाठी


थंड पदार्थ खाल्यास म्हणजेच आईसक्रीम खाल्याने मेंदूत ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स उत्तेजित होऊन तुम्हाला आनंदी वाटते. त्यामुळे आईसक्रीमचे नाव काढताच अनेकजण आनंदी होतात किंवा एखादा आनंदाचा क्षण आईसक्रीम खावून सेलिब्रेट केला जातो. 


सांधेदुखी किंवा सूज


यामुळे पेशीत ताण निर्माण होतो. अशावेळी बर्फ एका कपड्यात गुंडाळून त्या जागी लावा. आराम मिळेल.