निद्रानाशावर जायफळ असे ठरते उपयुक्त
भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.
मुंबई :भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.
जायफळाचे फायदे
जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता.
कसा कराल जायफळाचा आहारात समावेश
जायफळ – मधाचे मिश्रण :
जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी घ्यावे.
जायफळ आणि आवळ्याचा रस :
ग्लासभर आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते. वजन घटवणारी 15 हेल्दी घरगुती ड्रिंक्स !
जेवणात जायफळ :
रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.
जायफळ पावडर
तुम्हांला एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे आवडत नसल्यास चिमुटभर पूड पाण्यासोबत घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग केल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होईल.
खबरदारीचा उपाय – :
निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका. जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक असतो.