मुंबई : डोकेदुखी ही सध्याच्या काळात एक सामान्य समस्या आहे. बऱ्याच वेळा डोकेदुखीमुळे लोक खूप अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत तातडीने आराम मिळावा यासाठी अनेकजण गोळी घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र गोळी घेण्याऐवजी, तुम्ही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होईल. 


हाइड्रेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही स्टडीनुसार, दीर्घकाळ पाणी न पिणं हे डोकेदुखीचं एक सामान्य कारण आहे. पाणी न पिणं हे आपल्या एकाग्रतेवर देखील परिणाम करू शकते आणि चिडचिडेपणा वाढवू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यावं. यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.


आल्याचा चहा 


एका अभ्यासात असं आढळून आले आहे की, आलं डोकेदुखीपासून मुक्त करण्यास मदत करू शकतं. त्यामुळे तुम्ही एक कप आल्याचा चहा पिऊ शकता. 


झोप घ्या


झोपेचा अभाव आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला डोकेदुखी तर होतेच, पण तुम्हाला थकवाही जाणवतो. जर तुमची डोकेदुखी झोपेच्या अभावामुळे झाली असेल तर त्यावर उपचार करण्याचा एकमेव आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे झोप. या व्यतिरिक्त, जर तुमची डोकेदुखी स्क्रीनशी संबंधित असेल किंवा तुम्ही खूप वेळ स्क्रीनसमोर असाल तर डोळे आणि मेंदूला थोडी विश्रांती देणं महत्त्वाचं आहे.


आराम करा


तणाव हे डोकेदुखीचे मुख्य कारण ठरू शकतं. तणावमुक्त व्यायामाचा सराव केल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. योगाचा नियमित सराव, श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा ध्यान केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही नियमित योगाभ्यास करू शकता. हे तुम्हाला इतर अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करेल.


एरोमाथेरेपी


लेव्हेंडरसारखे वास डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकतात. इसेंशियल ऑईल प्रत्येकाला आवडत नाहीत. परंतु जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर चमेली, पेपरमिंट इत्यादी विविध एसेंशियल ऑयल एरोमाथेरपी खूप प्रभावी आहे.