कमी वयातच टक्कल वाढतंय? आणखी Tension घेण्यापेक्षा ही 4 तेल वापरा, Hair Fall थांबलाच म्हणून समजा..
अगदी २५-३० वर्षांच्या मुलांची केस गळू लागली आहेत आणि टेन्शन वाढू लागलं आहे बऱ्याच वेळा टक्कल पडण हे अनुवांशिक असू शकतं पण....
OILS FOR HAIR LOSS AND BALDNESS: एक जमाना होता ज्यावेळी टक्कल किंवा केस कमी होणं हे वाढत्या वयाची लक्षण समजली जायची मात्र बदलत्या काळात बरेच जण आहेत ज्यांचे कमी वयातच केस गळणं सुरु होऊ लागलं आहे.अकाली टक्कल पडू लागलं आहे . आताचं बदलत लाईफ स्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी ताण -तणाव या सर्वांचा परिणाम होऊ लागला आहे. अगदी २५-३० वर्षांच्या मुलांची केस गळू लागली आहेत आणि टेन्शन वाढू लागलं आहे बऱ्याच वेळा टक्कल पडण हे अनुवांशिक असू शकतं पण बऱ्याच जणांमध्येय बदलती जीवनशैली हेच मुख्य कारण आहे. आपल्या केसांना योग्य पोषण न मिळणं हे मुख्य कारण आहे केसगळती होण्याचं.जर केसांना योग्य पोषक तत्व मिळाली नाहीत तर वेळेआधी केस कमजोर होऊन केसगळती सुरु होईल,त्यामुळे केसांना पोषण मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे..
तेल लावल्याने केसांना योग्य पोषण मिळतं.पण तेल निवडणंदेखील खूप महत्वाचं असतं.चला जाणून घेऊया अशी कोणती तेलं आहेत जी लावून आपण केसगळती आणि टक्कल होण्यापासून रोखू शकतो .
1. बदामाचं तेल
बदामाच्या तेलात(Almond Oil) प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतं,ज्यामुळे प्रदूषण ,उन्हापासून होणारं डॅमेज या सर्वांपासून केसांचं सरंक्षण होत.नियमितप्रमाणे हे तेल केसांना लावल्याने केसांची वाढही उत्तम होते
2. खोबऱ्याचं तेल
नारळाचं तेल केसांसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे .हे केसांवर लावल्याने नुसती केसगळतीच थांबत नाही तर केसांना मजबुती मिळते आणि केस घनदाट होतात केस धुण्याआधी एक तास जर केसांना हे तेल लावलं तर याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल.
3.ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल(Olive Oil)चा वापर जेवणात केला जातो पण ऑलिव्ह ऑइलचा वापर आपण केसांसाठी केला तर केसांना भरपूर पोषण मिळतं, त्याचसोबत केस मजबूत होण्यासदेखील मदत होते . यामुळे केसगळती रोखली जाऊ शकते शिवाय केसांच्या मुळाशी काही इन्फेक्शन झालं असेल तर ते सुद्धा कमी होण्यास मदत मिळते डोक्यात खाज उठत असेल तर ऑलिव्ह ऑइल सारखा दुसरा पर्यायच नाही.