मुंबई : पावसाळा स्वतःसोबत अनेक आजार हा घेऊनच येतो. या आजारांमध्ये सर्दी, खोकला, अनेक प्रकारचे फ्लू इत्यादींचा समावेश असतो. मात्र या आजारांसोबतच आपल्याला डोळ्यांचे देखील संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. दरवर्षी भारतात डोळे येण्याची साथ येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कितीही स्वच्छता ठेवली तरी हा आजार पसरतच जातो. डोळे येणं हा आजार एकप्रकारचं इनफेक्शन असतं याला बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हटलं जातं. डोळे येऊ नये म्हणून काही गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत. तर पाहा डोळ्यांचं इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी


- दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे काजळ किंवा अन्य कॉस्मेटिक्स वापरू नये.


- इतर व्यक्तीने वापरलेल्या टॉवेलचा वापर करून नये.


- घरातील हात पुसायचा नॅपकिन सतत बदलावा. शिवाय इतर कोणाचाही नॅपकिन वापरून नये.


- रोजच्या वापरात असलेला रूमाल दररोज धुवावा. 2-3 दिवस एकचं रूमाल वापरू नये.


- लेन्स वापरत असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय दररोज वापरत असेलला चष्मा देखील स्वच्छ करा.


- हँड सानिटाझर वापरा.


- तुमत्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीचे डोळे लाल असतील तर त्यापासून लांब रहा.


- सतत डोळे चोळू नका.


- जर कधी तुमचे डोळे चुरचुरायला लागले तर स्वतःच्या मनाने किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे कोणतीही औषधं किंवा ड्रॉप्सचा वापर करू नका.