मुंबई : मुंबई आणि पुण्यातील नागरिक जर येत्या 2-3 दिवसांत लस घेण्याचा विचार करत असतील तर तुमचा थांबा... कारण महापालिकेने दिवाळीच्या दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये दिवाळीच्या सणानिमित्त चार दिवस सुट्ट्या असल्याने लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पाठोपाठ पुण्यातही तीन दिवस लसीकरण बंद आहे. त्यामुळे पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रावर 7 नोव्हेंबर नागरिकांना कोरोना लस मिळणार नाही. त्यामुळे आता थेट सोमवारी 8 नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.


को-विन डॅशबोर्डच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 1 कोटी 47 लाख 93 हजार 916 कोरोना प्रतिबंधक लसचे डोस देण्यात आले आहेत. तर मुंबईत 91 लाख 49 हजार 927 जणांना लसीचा पहिला डोस तर 56 लाख 43 हजार 989 जणांना लसचा दुसरा डोस देण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे.