महत्त्वाची बातमी : तुमच्या आरोग्य विम्याच्या यादीत कोरोना व्हायरसचं नाव आहे का?
आरोग्य विमासंदर्भात आयआरडीएने एक अहवाल सादर केला आहे.
मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसने भारतात देखील शिरकाव केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या ७३ वर गेली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस लागण झल्यास त्याचा खर्च पेलावणार का? असा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिला आहे. या आजाराचा पूर्ण खर्च विमा कंपन्या आपल्या खांद्यावर घेतील अशी समज आता नागरिकांमध्ये पसरत आहे. परंतु विमा कंपन्यांनी या गंभीर आजाराकडे पाठ फिरवली आहे.
कोरोना व्हायरस रूग्णांचा खर्च उचलण्यास विमा कंपन्यांचा नकार
जेव्हा एखादी विमा कंपनी ग्रहकाला आरोग्य विमा विकते तेव्हा त्या विम्यात अनेक अटी आणि शर्तींचा समावेश असतो. विमा कंपनी एखाद्या व्यक्तीला २४ तास रुग्णालयात दाखल केल्याबद्दल पैसे देते. या आरोग्य पॉलिसीमध्ये कंपनी अनेक आजारांच्या नावांची यादी ग्राहकाला पुरवते.
अशात कोरोना व्हायरस हा एक अत्यंत नवा आजार आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा खर्च करण्यास विमा कंपन्यांनी नकार दिला आहे. कारण या व्हायरस नावचं विमा कंपन्यांच्या यादीत नाही.
आयआरडीएने कोरोना व्हायरसला आजारांच्या यादीत सामाविष्ट करण्यास सांगितले आहे.
याप्रकरणी आयआरडीएने (Insurance Regulatory and Development Authority) समस्त विमा कंपन्यांना इशारा दिला आहे. गेल्या अठवड्यात आयआरडीएने एक अहवाल सादर केला. या अहवालात कोरोना व्हायरससंबंधीत संपूर्ण खर्च विमा कंपन्यांनी करण्याचे आदेश आयआरडीएने दिले आहेत. तसेच आयआरडीएने कंपन्यांना इशारा दिला आहे की कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत.
अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यापासून, बहुतेक विमा कंपन्या रूग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करत आहेत.