मुंबई : अनेकांना किचनमध्ये अन्नपदार्थ उघडे ठेवण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका पालीचा व्हिडीओ सध्या यूट्यूब, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्या पालीला पाहून भले भले घाबरतात अशी एक पाल कपवर उभी राहून चहाचा आस्वाद घेत असल्याचे व्हिडीओत दिसतेय. 


दरम्यान, हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर करताना किचन जेवण उघडे ठेवल्यास काय होईल असा काहीसा सल्लाही यातून देण्यात आलाय. ज्यांना अन्न झाकून ठेवण्याचा कंटाळा येतो अशा लोकांनी जरुर पाहा हा व्हिडीओ असे व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय. 



दरम्यान, या व्हिडीओ कितपत खरा आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.