तुम्ही रात्री अचानक झोपेतून उठता? मग शरीराचा `हा` भाग होतोय खराब
Sleep Disturbance At Night : जर तुम्हाला झोपून सारखी सारखी जाग येत आहे, पाय दुखी आणि निद्रानाश यासारख्या समस्या होतं आहेत. तर आताच सावध व्हा. कारण हे फॅटी लिव्हरचं लक्षण आहे.
Sleep Disturbance At Night : दिवसभर काम करुन घरी आल्यानंतर अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. गेल्या काही काळापासून झोप न येण्याची समस्या वाढली आहे. तर काही जणांना झोप लागली की काही वेळानंतर अचानक जाग येते. त्यानंतर परत झोप लागणं कठीण होऊन बसतं. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. (Waking up between 1 am and 4 am could signal of fatty liver disease health news in marathi)
रात्री वारंवार जाग येणे म्हणजे तुम्हाला निद्रानाशाची समस्या असू शकते. पण तुम्हाला माहिती आहे. की, तुमची झोप रात्री 1 ते पहाटे 4 च्या दरम्यान उघडली तर ही गंभीर गोष्ट असू शकते. जर्नल ऑफ नेचर अँड सायन्स ऑफ स्लीपच्या रिपोर्टनुसार हे यकृत खराब होण्याते लक्षणं आहे. रात्री वारंवार झोपतून जाग येणे म्हणजे तुमच्या यकृत खराब होण्याच्या मार्गावर आहे.
यकृत आणि झोपेचं काय संबंध?
तज्ज्ञांनुसार शरीराच्या अवयवांना पद्धतशीरपणे काम करण्यासाठी बॉडी क्लॉक विशेष भूमिका बजावतं. ते दिवस आणि रात्र यानुसार काम करतं. रात्री 1 ते 3 वाजेदरम्यान यकृत शरीरातील डिटॉक्सिफाईंग आणि साफसफाईचं सर्वात जलद गतीने काम करतं. जर यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाली आहे. त्याशिवाय नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असेल तर ते नीट काम करत नसेल, तर शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी जास्त जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. या सगळ्या क्रियेत मज्जासंस्था झोपेतून जागे होण्याचे संकेत देते आणि तुम्हाला जाग येते.
अशा स्थितीत यकृत खराब झाल्यामुळे तुम्हाला निद्रानाश, रेस्टलेस लेग सिंड्रोम, दिवसा झोप येते आणि येतं नाही, असा समस्या निर्माण होतात. तुम्हाला रात्री वारंवार जाग येत असेल तर तुम्ही लिवर फंक्सनची टेस्ट करुन घ्यायला हवी. या टेस्टमुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारख्या समस्येचं निंदा होऊन त्यावर वेळीच उपचार सुरु करता येईल.
हेसुद्धा वाचा - सकाळी उठल्याबरोबर उशी आणि चादरीवर 'या' खुणा दिसतायत का? असू शकतात कॅन्सरची लक्षणं
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)