Health Benefits of Walking : चालणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. पण चालण्यामुळे शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे समजून घेणे अत्यंत गरचे आहे. चालणे हा वर्कआऊटमधील अनसंग हिरो आहे. चालण्यामुळे शरीरासोबतच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते. चालताना तुमचं एक एक पाऊल आरोग्यासाठी खूप फायद्याचे रते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालताना पाय, पोटऱ्या, मांड्या, पोट, हात या सगळ्यांचाच एकाचवेळी व्यायाम होतो. रिसर्चनुसार ३० मिनिटे चालल्यावर जवळपास १५० कॅलरीज कमी होण्यास मदत होते. फक्त मैदानात किंवा मोकळ्या जागीच चालले पाहिजे असे काही नाही. अगदी ऑफिसमध्ये, घरात, कॉरिडोअरमध्ये देखील चालण्याने फायदे होतात. चालणे कायमच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कोणत्या वयात किती चालावे हे देखील समजून घेतले तर शरीरासाठी फायदाच होतो. तुम्ही कसे आणि किती चालता या सगळ्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चालण्याचे फायदे समजून घेतल्यावर आपल्या शरीरात होणारे बदलही लक्षात येतात. 


वजन कमी होते 


चालण्यामुळे वजन कमी होते हा प्रत्येकाला माहित असलेला उपाय. अनेकांना योगा किंवा व्यायामाला वेळ मिळत नाही अशावेळी चालणे तेवढेच उपयोगी ठरू शकते. चालण्यामुळे वजन तर कमी होतेच सोबत इतर 8 आरोग्यदायी फायदे समजून घ्यायला पाहिजे. 60 मिनिटे दररोज सकाळी चालणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. तसेच 


शरीर राहते पिळदार 


चालण्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. टोन बॉडी राहण्यासाठी देखील चालणे फायदेशीर ठरते. चालण्यामुळे पाय, पोटऱ्या, मांड्या तसेच हात पोट या भागावर परिणाम होतो. यामुळे पिळदार किंवा टोन बॉडी मिळवण्यासाठी फायदा होतो. 



हृदयाचे आरोग्य सुधारते


चालण्यामुळे हृदय देखील मजबूत राहते. हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी चालणे महत्वाचे आहे. अनेकांना हृदय रोग समस्या जाणवतात यावर चालणे फायदेशीर ठरू शखते. 


डायबिटिस कंट्रोलमध्ये 


मधुमेहाचे मुख्य कारण लठ्ठपणा आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी चालणे अतिशय महत्त्वाचे ठरते. डायबिटिसी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी चालणे कायम ठेवा. 


कॅन्सरपासून बचाव 


कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी चालणे फायदेशीर ठरते. अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी चालणे फायद्याचे ठरते. कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढू नये म्हणून अनेक उपाययोजना करता येतील यामधील हा एक उपाय आहे. 


मेंदू होतो तल्लख 


वयामानानुसार मेंदू थकतो. अशावेळी मेंदूमध्ये ताकद वाढवण्यासाठी देखील चालणे फायद्याचे ठरते. चालल्यामुळे माणसाची स्मरणशक्ती वाढते. 


सांधेदुखीपासून आराम 


चालणे हे फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर सांधेदुखीवर देखील आराम मिळवून देतो. चालल्यामुळे वजन कमी होते आणि सांध्यावरील ताण कमी होतो.


रोगप्रतिकारशक्ती वाढते 


चालल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे तुम्ही संक्रमणापासून किंवा साथीच्या आजारापासून दूर राहता. 


उत्साह वाढतो 


सकाळी चालल्यावर शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. यामुळे तुमचा दिवस अतिशय प्रसन्न आणि आनंदी राहतो.