मुंबई : मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये ट्राफिक ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपनगरातून कामासाठी शहरात जाताना अनेकदा चाकरमन्यांना ट्राफिकला तोंड द्यावे लागते. अशावेळेस अनेक  चालकांचे रागावरील नियंत्रण सुटते.  


काहीजण गंमतीने असेही म्हणतात, तुमचे रागावर नियंत्रण किती ? हे पहायचे असेल तर त्याची कसोटी स्टिअरिंगवर बसल्यावर होऊ शकते. 
कामाच्या ठिकाणी केवळ ट्राफिकमुळे पोहचवण्यास विनाकारण उशीर होत असेल तर तुमचाही रागाचा पारा चढतोय का ? मग तुम्ही स्वतःला शांत करण्यासाठी या काही गोष्टींची मदत घेऊ शकता.  


योगसाधनेच्या मदतीने रागावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.  


उन्मामी मुद्रा -  


मनाला शांत ठेवण्यासाठी,ताण तणाव आणि रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी उन्मामी मुद्रा फायदेशीर ठरते. पद्मासनात बसा. तुमच्या दोन आयब्रोमधील म्हणजेच तिसरा डोळा समजला जाणार्‍या भागावर लक्ष ठेवा. 


ट्राफिकमध्ये अडकल्यास काय कराल ?  


दीर्घ श्वास घ्या  


जसजसा तुमचा रागाचा पारा वाढतोय असं दिसेल तसे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात करा. ५-६ दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना ५ अंक मोजा. श्वास सोडल्यानंतर पुन्हा ५ अंक मनातल्या मनात मोजायला सुरूवात करा. श्वास घेण्यापेक्षा उच्छवास सोडण्याची प्रकिया थोडी दीर्घ ठेवा.  


मुष्ठी मुद्रा  -  


राग, ताणतणाव, नकारात्मक विचार अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे असल्यास मुष्ठी मुद्रा फायदेशीर ठरते.  मुष्ठि मुद्रा म्हणजे हाताची मुठ बनवणे. या मुद्रेमध्ये किमान ५-१० मिनिटे रहा. यामुळे रागावर नियंत्रण राहण्यास मदत होते.