उन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील या ट्रीक्स !
दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
मुंबई : दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
ब-याचदा अनेक लोक दिवसभर पुरेसे पाणी पिण्यास विसरतात. काहीजण कामात असल्यामुळे पाणी पिण्यास विसरतात तर काही जणांना स्वत: उठून पाणी घेण्याचा कंटाळा येत असतो. यासाठी जाणून घेऊयात दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी व योग्य प्रमाणात पाणी पिण्यासाठी या काही सोप्या टीप्स
पाणी पिण्यावर लक्ष ठेवा -
तुम्ही दिवसभर कितीदा आणि किती पाणी पिता हे मोजण्यासाठी वॉटर युअर बॉडी व वॉटरलॉग्ड सारखे मोबाईल अॅप्लीकेशन वापरु शकता. तुम्हाला दिवसभर किती वेळा व किती ग्लास पाणी प्यायचे आहे त्याचे सेटींग त्यामध्ये करा.ज्यामुळे या अॅप्लीकेशनच्या रिमांइडंर मुळे तुम्हाला दिवसभर पाणी पिण्याची नक्कीच आठवण राहील.
पाण्याच्या चवीत बदल करा -
जर तुम्हाला साधे पाणी पिणे आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू पिळून त्याची चव बदलू शकता.कारण लिंबू पाणी फक्त रिफ्रेशींगच असते असे नाही तर त्यामुळे दिवसभर तुम्ही हायड्रेट राहू शकता व तुम्हाला थकवा देखील येत नाही.लिंबामध्ये फायबर,पॅक्टीन हे घटक असतात ज्यामुळे तुमची भूक देखील भागू शकते.
टायमर सेट करा -
तुम्हाला किती पाणी पिण्याची गरज आहे यावर हा उपाय अवलंबून आहे. यासाठी टायमर सेट करा अथवा लक्षात राहण्यासाठी या गोष्टीची नोंद करुन ठेवा. जर तुम्ही स्टिकी नोट वापरत असाल तर त्यावर लिहून तुम्ही दिवसभर ज्या ठिकाणी जास्त वेळ असता तिथे या नोट चिकटवून ठेवा.या युक्तीमुळे तुम्ही दिवसभर पुरेसे पाणी पिऊ शकता.
पाण्याचे प्रमाण भरपूर असलेले पदार्थ खा -
पोषणाबरोबरच फळे व भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण देखील योग्य असते. यासाठी कलिंगड,काकडी व टोमॅटो या सारखे पाणीयुक्त पदार्थ खा.या पदार्थांमुळे दिवसभरात तुमच्या शरीरातील २० टक्के पाण्याची गरज भागविली जाईल.
बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा -
तुम्ही दिवसभर बाहेर जाणार असाल अथवा कामाच्या ठिकाणी दिवसभर डेस्कवर बसुन काम करणार असाल तर तुमच्यासोबत एखादी पाण्याची बाटली अवश्य घेऊन जा.त्यामुळे जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुमच्याजवळ पाणी असेल.
सूप व फळांच्या रसावर अधिक भर द्या -
आहारात सूप व फळांच्या रसाचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पाणी मिळण्यास मदत होईल.सुप प्यायल्याने तुम्ही हायड्रेट रहाल व तुमच्या शरीरातील कॅलरी काउंट देखील नियंत्रित राहील.
वॉटर ब्रेक घ्या -
जर तुमचे काम कंप्युटरवर दिवसभर एकाच ठिकाणी बसून करण्यासारखे असेल तर अशामुळे तुम्ही पाणी पिणे विसरण्याची शक्यता अधिक असते.यासाठी ऑफिसमध्ये असताना ऑफिस कलीगसोबत थोडावेळ उठून एखादा वॉटर ब्रेक घ्या ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
पाणी पिणे हा एक विधी आहे असे समजा -
पुरेसे पाणी पिण्यासाठी दिवसभर पाणी पिण्याचे योग्य नियोजन करा. उदा.सकाळी उठल्यावर तुम्ही दोन ग्लास पाणी पिऊ शकता. जेवल्यावर एक ग्लास पाणी प्या, वॉशरुम अथवा रेस्टरुममध्ये गेल्यावर एक ग्लास पाणी प्या व झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या.यामुळे दिवसभरात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी नक्कीच पिऊ शकता.
आकर्षक पाण्याची बॉटल खरेदी करा -
पाण्याची बाटली अधिक आकर्षक, ब्राइट आणि फॅन्सी असेल तर तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी करा या ’5′ आरोग्यदायी आणि आकर्षक बाटल्यांची निवड तसेच पाणी पिणे अधिक आकर्षित करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये स्ट्रॉ,आइस क्युब्स किंवा स्टॉबेरी सारखी सुंदर फळे यांचा देखील वापर करु शकता.
स्वत:ला प्रोत्साहन द्या -
एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सेल्फ-मोटीवेशन फार महत्वाचे असते.यासाठी तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता याकडे नीट लक्ष द्या व निरोगी आयुष्यासाठी दिवसभर स्वत:ला पुरेसे पाणी पिण्यासाठी प्रवृत्त करा.