मुंबई : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. उन्हाळ्यात एसी, कूलरशिवाय घरात बसणंही कठीण होते. पत्र्याचं छप्पर किंवा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकं राहत असतील तर घामाच्या धारा आणि उकाड्याने जीव नकोसा होतो. अशावेळेस एसी घ्यावा का? असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा कारण एसीचे  आरोग्यावर काही दुष्परिणामही होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसीशिवाय घरात नैसर्गिक मार्गाने थंडावा निर्माण करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मग पहा तुम्ही यापैकी कोणता मार्ग निवडू शकत आहात? 


बर्फ -  


बर्फाचा वापर थोडा हुशारीने केला तर तुम्हांला घरात एसी प्रमाणे थंडावा निर्माण होण्यास मदत होते. टेबल फॅनखाली खोलगट भांड्यांत बर्फाचे तुकडे ठेवा. यामुळे जसा फॅनचा स्पीड असेल तसा बर्फ वितळून त्याचे थंडगार तुषार हवेमध्ये पसरून घरात थंडावा निर्माण होण्यास मदत होईल.या '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !


वाळ्याचे पडदे - 


प्रामुख्याने विदर्भात वाळ्याचे पडदे हे घरात थंडावा निर्माण करण्यासाठी वापरले जातात. वाळ्याच्या पडद्यांवर पाणी शिंपडल्यानंतर त्याला भेदून येणारी हवा अधिक थंडावा निर्माण करण्यास मदत करते. हा पर्याय म्हणजे शहरातील सेंट्रल एसीप्रमाणे घरात काम  करतो. वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर


लादी पुसा - 


रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने जमीन स्वच्छ पुसा. किमान मॉबिंग किंवा थंड कपडा फिरवल्यास आपोआपच जमिन आणि खोलीदेखील थंड राहण्यास मदत होते. 


अनावश्यक  लाईट बंद करा -


घरात अनावश्यक बल्ब चालू ठेऊ नका. सतत बल्ब चालू ठेवल्यास त्यामधून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान 1-2 तास आधी बल्ब बंद करा. म्हणजे रात्री झोपताना घरात थंडावा राहील.


सुती कपडे - 


घराचे पडदे, चादरी हे पॉलिस्टर किंवा सॅटीनचे असल्यास ते कटाक्षाने बदलून सुती, कापडी बनवा. तसेच हलके फुलके रंग निवडा.म्हणजे घरात हवा खेळती राहण्यास मदत होईल.


झाडं लावा - 


खिडकीवर किंवा घराच्या बाल्कनीत झाडं ठेवा. यामुळे उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थोडा थंडावा राहण्यास मदत होईल. खिडकी केवळ हवा येण्यासाठी उघडी /मोकळी ठेऊ नका.उन्हाळ्यात वीज गूल झाल्यावर एसीशिवाय शांत झोप मिळवण्यासाठी खास ७ टिप्स!