मुंबई : सुंदर व चमकदार केस सौंदर्यात भर घालतात. केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी तेल, शॅम्पू, कंडीशनर असे अनेक प्रॉडक्ट आपण वापरतो. त्यात भर पडली आहे ती हेयर जेलची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलाप्रमाणे केसांना जेल लावणं देखील सामान्य झालं आहे. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त जेल तरुणाई सर्रास वापरते. त्याचे फायदे-तोटे लक्षात न घेता केस सेट करण्यासाठी जेल हमखास वापरले जाते. पण या केमिकल जेल पेक्षा घरच्या घरी नैसर्गिक जेल तयार केले तर ? कसे ? अगदी सोपे आहे. त्यामुळे केसांना हानी न पोहचता केसांचे पोषण होईल. कोरफड आणि जिलेटीनचा वापर करून आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी जेल तयार करू शकतो. तसंच घरी बनवलेले हे जेल केमिकल फ्री असल्याने वापरण्यास सुरक्षित आणि परिणामकारक आहे.


कोरफड जेल:


त्वचा आणि केसांसाठी कोरफड किती फायदेशीर आहे, हे आपण सर्वच जाणतो. कोरफड जेल त्वचा आणि केसांचे पोषण करते. पण त्यासाठी जेल केमिकल फ्री असणे गरजेचे आहे. कारण बाजारात हिरव्या रंगाची कोरफड जेल उपलब्ध आहे. पण त्यात केमिकल न घालता नैसर्गिकरीत्या कोरफड जेल घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया.


  • जेल करण्यासाठी कोरफड उभी चिरा आणि त्यातील गर काढून घ्या.

  • त्यात हेयर फ्रेंडली ऑइलचे म्हणजेच टी ट्री, लेमन, लव्हेंडर किंवा रोजमेरी ऑईलचे काही थेंब घाला. 

  • एकत्रित मिक्स करून केसांना लावा.

  • राहिलेली जेल तुम्ही फ्रीजमध्ये ठेऊन गरजेनुसार वापरू शकता. 



जिलेटीन जेल:


  • जिलेटीनचा वापर फक्त पदार्थ बनवण्यासाठी नाही तर हेयर जेलसाठी देखील होतो.

  • कपभर गरम पाण्यात १ चमचा जिलेटीन घाला.

  • व्यवस्थित ढवळा आणि जिलेटीन नीट सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.

  • त्यानंतर त्यात लाईम सारखे आवडते essential oil घालून वापरा.


टीप: हे सगळे पदार्थ ऑरगॅनिक असल्याने ते फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते कमी प्रमाणात बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.