मुंबई : हल्लीच्या या धकाधकीच्या दिवसांमध्ये दर तिसरा माणूस स्थुलतेमुळं त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. यावर तोडगा म्हणून काही मंडळी डाएटिंगच्या बहुविध वाटा निवडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, या डाएटिंगचा खरंच कितपत फायदा होतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 


वजन कमी करण्यासाठी तुम्हीही जर खाण्याचं प्रमाण कमी करुन त्यादरन्यानचं अंतर वाढवलं असेल तर, आताच थांबा. 


आरोग्यदायी खाणं आणि सोबतच दररोज व्यायाम करणं या सवयी तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. यासाठी दिवसाची सुरुवात सुरेख अशा न्याहारीनं अर्थात ब्रेकफास्टनं करणं उत्तम पर्याय. 


हल्ली ब्रेकफास्टसाठीही वजन कमी करणाऱ्या पदार्थावरच जोर दिला जातो. पण, तुम्हाला माहितीये का? उपमा, हा एक असा पदार्थ आहे, जो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी बरीच मदत करेल. 



पोट भरण्यासोबतच या पदार्थामध्ये वापरण्यात येणाऱ्या सामग्रीतील प्रत्येक घटक हा आरोग्याचा्या दृष्टीनं हितकारक असेल. बरं, हा पदार्थ खात असताना पोटाची चरबी वाढण्याचा ताणही तुमच्यावर नसेल. 


त्यामुळं आहाराच्या सवयींमध्ये BREAKFAST च्या वेळी उपमा नक्की खा....